जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर दहिफळे यांची निवड झाली़ शनिवारी दुपारी १२ वाजता पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांना १० तर दिनकर दहिफळे यांना ११ मते मिळाली़ ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, २१ कोटी वीस लाख रुपये खर्चून करण्यात येणा-या या रस्त्यांच्या कामावेळी डांबरामध्ये निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करण्यात येणार आहे ...
जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. ...
नांदेड : किनवट येथील ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ९२ बाह्यरुग्ण विभाग स्थापन करण्यात येणार असून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.आतापर्यंत जवळपास १७ हजार रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आल् ...
मुदखेड तालुक्यातील बारड विभागातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशापोटीचा निधी २० जुलै २०१६ रोजी जमा झाला आहे. मात्र, केवळ बँक खात्याअभावी विद्यार्थी गणवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत. ...
महाराष्ट्रातील लोकनाट्य कलावंतांची उतारवयातील परवड थांबविण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रमांची स्थापना करावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत मंदाराणी खेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील चार विद्याशाखेच्या २९ अभ्यास मंडळासाठी विभागप्रमुखांमधून प्रत्येकी तीन प्रतिनिधींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. यातील १६ अभ्यास मंडळाच्या ...
सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून पहिल्या फेरीत लिलाव झालेल्या सहा वाळू घाटांतून सव्वाचार लाख कोटी तर कोळगाव या काळी वाळू उपशापोटी ५० लाख असा एकूण ५ कोटींचा महसूल बिलोली तालुक्यातून मिळणार आहे़ ...
जिल्ह्यात ८९ वाळूघाटांची ई-लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत २९ वाळूघाटांचा लिलाव झाला असून पहिल्या फेरीत जिल्हा प्रशासनाला १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल मिळणार आहे. ...