शहर स्वच्छता निविदा प्रकरणी पुन्हा एकदा दुसर्या क्रमांकाचे दर असलेल्या बंगळुरुच्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या रिट याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी या निविदा प्रक्रियेवर स्थगिती मिळविली आहे. ...
मुदखेड तालुक्यातील बारड हे गाव नेहमीच आगळेवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे़ मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढून टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़ ...
जलयुक्त शिवारच्या कामांना जिल्ह्यात गती मिळेनाशी झाली असून ५ हजार ४२४ पैकी आजघडीला केवळ ३९२ कामे पूर्ण झाली आहेत़ या कामांवर २ कोटी १९ लाख रुपये खर्च झाला आहे. ...
प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने वजिराबाद पोलिसांनी शहरातील सात खाजगी डॉक्टरांवर गुन्हा नोंदविला आहे़ ...
बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे ...
येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणा-या करिश्मा नरवाडे हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या अंतिम इच्छेनुसार नववधूचा श्रृंगार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ ...
जिल्हा परिषदअंतर्गत येणा-या प्राथमिक व माध्यमिक आणि निरंतर या तिन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा कारभार वा-यावर आला असून प्राथमिकसह आता माध्यमिक विभागाचा कारभारही कार्यालय अधीक्षकाकडे सोपविण्याच्या हालचाली सुरु आहेत. ...
बिटकॉइनच्या नावाखाली जिल्ह्यात शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला असून सुमारे १०० कोटींची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नांदेड पोलिसांकडे चौघांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ पोलिसांकडे यासंदर्भात येणाº ...
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित महाराष्टÑ राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान कुसुम सभागृहात दुपारी ४ वाजता तर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री ८ वाजता पार पडणार आहे. ...