पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली होती़ रजिस्ट्री कार्यालय, शासकीय कार्यालय त्याचबरोबर आॅनलाईन करण्यात येणाऱ्या अनेक कामांना त्याचा फटका बसला़ महावितरणच्या झटक्याने अनेक भागात तर पंधरा-वीस ता ...
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण करण्यास मनपाच्यावतीने सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील तरोडा झोनमध्ये या सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले असून लवकरच संपूर्ण मनपा हद्दीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ...
अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...
शहरातील वसंतनगर भागातील व्यापारी संतोष सुधाकरराव मुखेडकर यांनी व्याजाच्या पैशासाठी सावकारांकडून होणाºया त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येपूर्वी मुखेडकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे चिठ्ठी लिहून पैशासाठी त्रास देणाºया ...
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येपासूनच दमदार आगमन झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने पाण्याचा येवाही सुरुच आहे. प्रकल्पात सद्य:स्थितीत ३० दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून ...
जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिव ...
वेतनवाढ तसेच कामगार करार नव्याने व कर्मचा-यांच्या हिताचा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ८ जूनपासून सुरू करण्यात आलेला अघोषित संप शनिवारी दुस-या दिवशीही सुरू होता. ...
यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत याचे नियोजन सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. ...
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मागील दोन दिवसांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पावसाने सीता आणि पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात तर सर ...