शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

आरटीओचा डोळा चुकवित परप्रांतीय वाहनांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:47 AM

कोणतीही मार्गपरवानगी न घेता नांदेड जिल्ह्यातून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे परप्रांतीय खाजगी ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक सुरु असून

ठळक मुद्देपाच राज्यांतील वाहने नांदेडात शासनाचा महसूलही बुडाला

नांदेड : कोणतीही मार्गपरवानगी न घेता नांदेड जिल्ह्यातून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे परप्रांतीय खाजगी ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक सुरु असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे़ तर दुसरीकडे दहा प्रवाशांची क्षमता असलेल्या वाहनातून तब्बल २४ प्रवाशांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे़ या सर्व प्रकाराकडे आरटीओकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे़इतर राज्यांतील वाहनांना दुसऱ्या राज्यात जर प्रवासी वाहतूक करावयाची असेल तर त्यासाठी मार्ग परवानगी घ्यावी लागते़ परंतु नांदेडात धावणा-या उत्तर प्रदेशाच्या ४, पाँडीचेरीच्या २, कर्नाटकच्या २, ओडीसा २, छत्तीसगड ४ यासह दररोज नांदेड-बीदर धावणा-या घरगुती वापराच्या ५० हून अधिक वाहनांकडून कोणतीही परवानगी न घेता प्रवाशांची वाहतूक केली जाते़ नांदेडातील ट्रॅव्हल्सचालकांना आरटीओकडे तीन महिन्याला ५७ हजार ७५० रुपयांचा कर भरावा लागतो़ याउलट परप्रांतीय वाहने मात्र चिरीमिरी देवून बिनदिक्कतपणे राज्यात धुमाकूळ घालत आहेत़ याबाबत नांदेड जिल्हा टॅक्सी परवानाधारक संघटनेनेही तक्रारही केली आहे़परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही़ तर दुसरीकडे सवलतीचा लाभ घेणा-या जवळपास ३०० स्कूल बसकडून लग्नसराईत व-हाडी मंडळीची वाहतूक करण्यात येत आहे़२८ एप्रिलला तर शहरातील सर्व ३०० स्कूल बसेस बुक आहेत़ एकीकडे नियमबाह्यरित्या होणा-या या वाहतुकीकडे दुर्लक्ष करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना दुसरीकडे वाहनधारकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी मात्र तीन-तीन महिने ताटकळत ठेवण्यात येत आहे़ एक महिना अगोदर आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल अडीच ते तीन महिने लागत आहेत़ एवढे दिवस वाहन उभे ठेवणे शक्य नसून त्यामुळे प्रामाणिक वाहनचालकांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे़कारवाई करणारस्कूलबस वाहनाच्या परवानगीमध्ये कुठेही प्रवासी वाहतूक करण्याचा उल्लेख नाही़ त्यामुळे स्कूल बसचालकांनी नियमाप्रमाणेच वाहतूक करावी़ अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल़तसेच परराज्यातील वाहने नांदेडात धावत असल्याचे अद्याप तरी, निदर्शनास आले नाही़ त्यासाठी लवकरच तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार असून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली़

टॅग्स :Nandedनांदेडstate transportएसटीRto officeआरटीओ ऑफीस