शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:09 AM

एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव...

ठळक मुद्देएकापेक्षा एक सरस कवितांनी रसिकांना ठेवले खिळवून

नांदेड : एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव... अशी कुणब्याच्या जीवनावर आधारित कवितेतून कवी महेश मोरे यांनी आजचे वास्तव मांडले.नांदेड जिल्हा शासकीय ग्रंथालयाकडून आयोजित ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात कविंनी एकापेक्षा एक कविता सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.कवियित्री सारिका बकवाड यांनी समाजातील काही पुरूषी समाज बाईलेकींना उन्माद वृत्तीतून पाहत आहे, अमानुष अत्याचारी विकृतीतून स्त्री बळी ठरत आहे, अशी मन सुन्न करणारी कविता सादर केली. यामुळे श्रोते गंभीर झाले होते. तर शिवारात गातो बघा गाणं शिवाराचं, गायीगुरं गोतावळा लेणं शिवाराचं... पावसानं दिला दगा ओस ही खाचर गाभडल्या शिवारात घायाळ पाखरं ही शब्दांची मांडणी ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले यांनी केली़ यमदुत भोवताली असतात धाक पर्जत धमकी नको यमा रे, चल उघड दार येतो, ही गझल प्रसिद्ध गझलकार बापू दासरी यांनी सादर करून वाहवा मिळविली़ सगळ्याच शहराला आता डिजिटल बॅनरची बाधा झाली काय? कळत नाही़ पीक का आलं हे जोमानं, का फडफडू लागल्या आहेत खोट्या पताक्या वाऱ्याने... कुणाचे वाढदिवस तर कुणाचे सत्कार, कुणाचे पक्षांतर तर कुणाचे सत्तांतर ही बॅनरबाजी शहराच्या विद्रूपीकरणावरची कविता देवीदास फुलारी यांनी सादर केली.प्रवृत्तीवर टीका करणारी जगणाºयाची जात पहा, मरणाºयाची जात पहा ही कविता देवदत्त साने यांनी तर ग्रंथसंगती या ग्रंथाचे विवेचन मांडणारी कविता सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी सादर केली.कवी माधव चुकेवाड, शंकर वाडेवाले, प्रा. अशोककुमार दवणे, डॉ. भगवान अंजनीकर, पांडुरंग तुपेवाड, सदानंद सपकाळ, देवीदास फुलारी, बापू दासरी, डॉ. अमृत तेलंग, शं. ल. नाईक, विजया गायकवाड, बालाजी पेठे, शंभुनाथ कहाळेकर, आत्माराम राजेगोरे, लता शिंदे, विठ्ठल जोंधळे, अशोक कुबडे यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमास मराठवाड्यातील रसिक, वाचक व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले. यशस्वीतेसाठी आशिष ढोक, प्रताप सूर्यवंशी, संजय कर्वे, राजेंद्र हंबिरे, निर्मलकुमार सूर्यवंशी, संजय पाटील, गजानन कळके, शिवाजी पवार, दिनेश लासरवार, यशवंत राजेगोरे, बी. जी. देशमुख, कुबेर राठोड, विठ्ठल काळे, त्र्यंबक चव्हाण, कोंडिबा काठेवाड आदींनी परिश्रम घेतले.

राजकारणात महा बाप पुरा पुरा कंगाल झाला़ पानं सगळी गळून गेली, वाळलं उभं झाड झालाग़ावातली पोरंसोरं लीडर त्याले म्हणायचे, दस्ती टाकून गळ्यामंदी मागंपुढं हिंडायचे़ मागंपुढं माणसं पाहून बाप महा फुगायचा़ होतं नव्हतं वावर इकून रोज कोंबडं कापायचा़ सामान्य माणसाची राजकारणाची स्थिती मांडणारी व-हाडी भाषेची किनार असलेली कविता अशोक कुबडे यांनी सादर केली़

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्य