एकमेव आधार कोरोनाने नेला, कुटुंबांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:30+5:302021-06-06T04:14:30+5:30
चौकट - पालक गेले निराशेच्या गर्तेत आपला एकुलता एक आधार गमावल्यानंतर पालक निराशेच्या गर्तेत गेले आहेत. पोटचा गोळा, भविष्याची ...

एकमेव आधार कोरोनाने नेला, कुटुंबांची परवड
चौकट - पालक गेले निराशेच्या गर्तेत
आपला एकुलता एक आधार गमावल्यानंतर पालक निराशेच्या गर्तेत गेले आहेत. पोटचा गोळा, भविष्याची काठी गेल्यानंतर आम्ही कुणाकडे पहायचे ही चिंता त्यांना सतावत आहे. घरातला मुख्य आधार गेला हे दुख तर आहेच पण उरलेल्या दिवसात आता कुणाकडे हात पसरायचे याचे दु:ख मोठे आहे.
पालकांना मदतीची गरज
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयानक होती. एप्रिल ते मेच्या अखेरपर्यंत मृत्यूंची संख्या वाढतीच होती. एप्रिलमध्ये प्रतिदिन २८ मृत्यू होत होते. यात तरूणांचाही समावेश होता. एकमेव आधार गमावलेल्या अशा पालकांनाही शासनाने मदत करणे गरजेचे आहे. घरातील कर्ता गेल्याचे दुख त्यांच्यापुढे आहेच पण उरलेले दिवस कसे काढायचे याबाबतही त्यांना चिंता लागली आहे. उतरत्या वयात आधाराची गरज असताना आधारच गमावला. त्यामुळे राज्य शासनाने अशा पालकांचाही शोध घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे. कोलमडलेले घर सावरण्याची आवश्यकता आहे.
डॉ. हंसराज वैद्य - सामाजिक कार्यकर्ते, नांदेड.