यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:13+5:302021-06-04T04:15:13+5:30
मागील वर्षी दिवाळीनंतर ठरावीक वर्गाच्या शाळा उघडण्यात आल्या होत्या. मात्र त्यापूर्वी ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ...

यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण
मागील वर्षी दिवाळीनंतर ठरावीक वर्गाच्या शाळा उघडण्यात आल्या होत्या. मात्र त्यापूर्वी ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले होते; परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक कारणांमुळे ऑनलाईन शिक्षण मिळू शकले नव्हते. त्यामुळे गतवर्ष हे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नुकसान करणारे ठरले. आता पुन्हा हे वर्ष अशाच पद्धतीने जाणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना धोका जास्त असल्याने शाळांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.
चौकट-
या वर्षीही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू होण्याची शक्यता नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाला तर मागील वर्षीप्रमाणे नववी ते दहावी व नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील दोन महिने कसे जाणार यावर ते अवलंबून आहे. विविध आव्हाने पेलत शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
चाैकट-
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नियोजन करण्यात येईल. कोरोनाचा धोका अद्याप कमी झाला नाही. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिक्षणाचेच असेल. त्यानुसार शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड