शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीतील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 16:12 IST

याप्रकरणी मुख्याध्यापकांसह पाच जणांवर गुन्हे दाखल असून उर्वरित चार आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही.

ठळक मुद्दे मुख्याध्यापकासह चार जण फरार सपोनि. शिंदेंची चौकशी करण्याची मागणी 

बिलोली (जि़ नांदेड) : तालुक्यातील शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी सय्यद रसूल याला पाचव्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांसह पाच जणांवर गुन्हे दाखल असून उर्वरित चार आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही.

सय्यद रसूल, दयानंद राजुळे यांच्यासह इतर तिघांवर माहिती दडवून ठेवल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला होता़ परंतु घटना उघडकीस आल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते़ आरोपींच्या अटकेसाठी सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहेत़ अनेक तालुक्यांमध्ये बंदही पाळण्यात आला होता़ दरम्यान, बुधवारी पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ, बालाजी हिंगनकर, केंद्रे, बाबर, श्रीरामे यांच्या पथकाने बोंढार शिवारात लपून बसलेल्या सय्यद रसूल महेबूब याला अटक केली़ दुसराही आरोपी लवकरच पकडला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक  सोमनाथ शिंदे यांना तात्काळ निलंबित करुन स्वयंपाकी महिलेचे नाव वगळण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा केशव खासबागे व राजरत्न डुमणे यांनी दिला आहे़   

सपोनि. शिंदेंच्या भूमिकेवर संशयपीडित मुलीच्या आईने रामतीर्थ पोलिसांत तक्रार दिली होती़ या प्रकरणात सपोनि. सोमनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सामाजिक संघटनांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता़ त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे़ 

बिलोली, उमरीत कडकडीत बंद शाळेत अल्पवयीन   विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी बिलोली, उमरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.बिलोलीत सर्व बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चास शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाला निवेदन सादर केले.

पाचव्या दिवशीही शाळा भरली नाहीसाईबाबा माध्यमिक विद्यालयात सदरील घटना उघडकीस आल्यानंतर पाच दिवस उलटले आहेत; परंतु गेल्या पाच दिवसांपासून शाळेत एकही विद्यार्थी आला नाही़ तसेच इतर शिक्षकही शाळेत येण्यास धजावत नाहीत़ त्यामुळे पाच दिवसांपासून शाळा बंदच आहे़  

टॅग्स :ArrestअटकRapeबलात्कारNandedनांदेडPoliceपोलिसStudentविद्यार्थी