विष पिऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST2021-04-29T04:13:36+5:302021-04-29T04:13:36+5:30

गळफास लावून युवतीची आत्महत्या हिमायतनगर : येथील पल्लवी देवानंद गोरकर (वय २२) या युवतीने २६ एप्रिल रोजी गळफास लावून ...

One commits suicide by drinking poison | विष पिऊन एकाची आत्महत्या

विष पिऊन एकाची आत्महत्या

गळफास लावून युवतीची आत्महत्या

हिमायतनगर : येथील पल्लवी देवानंद गोरकर (वय २२) या युवतीने २६ एप्रिल रोजी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. हिमायतनगरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

त्या आरोपीला पोलीस कोठडी

कंधार : नंदनवन, ता. कंधार येथील सरपंचाच्या भावावर ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून हल्ला झाल्याची घटना शनिवारी झाली. उस्माननगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. आरोपीला लोहा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शरद हुंबाड यांनी या घटनेची फिर्याद दिली हाेती. आरोपी दिगंबर भागानगरे आणि मोहन भागानगरे यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

भीमजयंती उत्साहात

उमरी : शेलगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. सरपंच माधवराव पाटील कदम, उपसरपंच संजय पाटील कदम, सदस्य रमेश टोंपे, नामदेव भदरगे, राजू कोमटे, माधव हणवते, गोविंद हणवते, मधुकर हणवते, व्यंकटी वाघमारे, प्रकाश झुंजारे, प्रकाश हणवते, गौतम हणवते, माधवराव हणवते, चंद्रकांत वाघमारे, आदी उपस्थित होते.

सांडपाण्याचा विळखा

मुदखेड : मुगट येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात सांडपाणी असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या दवाखान्याच्या क्षेत्रात पाच ते सहा गावांचा समावेश आहे. अनेक गावांतील पशुपालक दररोज येथे येतात. मात्र, दवाखान्याच्या भोवती सांडपाणी असल्याने सांडपाण्यात टाकलेल्या दगडावर पाय ठेवून दवाखान्यात जावे लागते. दिवसेंदिवस सांडपाणी वाढत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हनुमान जयंतीनिमित्त अन्नदान

उमरी : येथील हनुमान गल्ली येथे हनुमान गणेश मंडळाच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार, टायगर ग्रुपचे साई खांडरे, छावाचे राजेश जाधव, संदीप पाटील, अतुल अचकुलवार, संतोष गंगासागरे, कृष्णा खांडरे, अमोल कानोडे, सय्यद खलील, साईनाथ खांडरे, गोपाल लोढ, पप्पू रुद्रवाड, माधव सोळुंके, विनोद वर्मा, आझादसिंग बावरी उपस्थित होते.

निराधारांचे पैसे जमा

उमरी : तालुक्यातील १८०० निराधार लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयातून ९२ लाख रुपये बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिली. सात महिन्यांचे निराधारांचे मानधन थकले होते. ते मानधन १६ मार्च रोजी जमा करण्यात आले. निराधार लोकांना कोरोना नियम पाळून अनुदान देण्यात येत असल्याची माहिती बोथीकर यांनी दिली.

महिलांना साड्यांचे वाटप

मुदखेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करून गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. रावसाहेब चौदंते यांनी हा उपक्रम घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सूर्यकांत चौदंते, अविनाश झमकडे, साहेबराव कांबळे, संदीप पाटील, बालाजी दिनगे, एकनाथ तारू, राहुल चौदंते, शेख जब्बार, संदीप चौदंते, पोलीस कर्मचारी बलवीरसिंग ठाकूर, गंगाधर शिंदे, आदी उपस्थित होते.

मुलगा हरवल्याची तक्रार

हदगाव : तालुक्यातील उंचाडा येथील खंडू बबन डोके (वय १७) हा घरातून निघून गेल्याची तक्रार वडील बबन डोके यांनी मनाठा पोलीस ठाण्यात दिली. खंडू हा गोरा, बांधा सडपातळ, पावणेपाच फूट उंची, अंगावर पँट, शर्ट, पायात चप्पल असल्याचे डोके यांनी नमूद केले. फौजदार टी. वाय. चित्तेवार तपास करीत आहेत.

विनाकारण घराबाहेर पडू नका

हिमायतनगर : शहर व तालुक्यातील जनतेने आपल्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडू नये, नागरिकांनी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी केले. दरम्यान, आमदार जवळगावकर यांनी हिमायतनगरला भेट देऊन बंदला मिळत असलेल्या प्रतिसादाची पाहणी केली. यावेळी अनेकजण उपस्थित होते.

पाण्याची टंचाई

भोकर : तालुक्यातील डौर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या डौरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. या संदर्भात गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पाणीटंचाईला ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. लोकसहभागातून बोअर मारण्यासाठी प्रत्येक घराकडून एक हजार रुपये जमा करून देण्यात आले. मात्र, बोअर मारण्यात आला नाही. या संदर्भात मासिक बैठकीमध्ये चर्चाही झाली. मात्र, कारवाई झाली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Web Title: One commits suicide by drinking poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.