शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

गुरुजी तुम्ही सुद्धा! पाण्यातून गुंगीचे औषध देत मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:38 IST

मुख्याध्यापकाच्या अत्याचाराने अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती; नांदेडमध्ये नेऊन केला गर्भपात

नांदेड : पोलिस अकॅडमी दाखवितो, म्हणून कारमध्ये विद्यार्थिनीला तामसा येथून घेऊन निघालेल्या मुख्याध्यापकाने पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार करीत पीडितेला गर्भवती केले. ही बाब कुटुंबीयांना समजल्यानंतर या प्रकरणात तामसा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी तामसावासीयांनी कडकडीत बंद पाळला. 

पीडित मुलीचे आईवडील हे एका शिक्षकाच्या शेतात राहतात, तर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीत असून, ती शिक्षणासाठी तामसा येथील मामाकडे राहत होती. शाळेतील मुख्याध्यापक राजूसिंह चौहान हा जे विद्यार्थी इंग्रजीत कच्चे आहेत, त्यांच्यासाठी वेगळा वर्ग घेत असे. त्यातून मुख्याध्यापक चौहान आणि पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख झाली, तसेच पुढे चौहान याचे पीडितेच्या वडिलांशी बोलणेही वाढले. पीडितेला पोलिस बनून आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा होता, ही बाब मुख्याध्यापक चौहान याला समजल्यानंतर त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगून नांदेडला पोलिस अकॅडमी पाहण्यासाठी घेऊन जातो, असे सांगितले. पीडितेच्या आई-वडिलांनीही मुख्याध्यापकावर विश्वास ठेवत जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर, नोव्हेंबर २०२४ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत मुख्याध्यापक चौहान हा आपल्या चारचाकीत विद्यार्थिनीला घेऊन नांदेडला निघाला होता. सोबत अन्य मुली असल्याचे त्याने पीडितेला सांगितले होते, परंतु कुणीही आले नाही. तामसा रस्त्यावर एका ठिकाणी कार थांबवून चौहान याने गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पीडितेला पिण्यासाठी दिले. त्यामुळे विद्यार्थिनीची शुद्ध हरपली अन् चौहान याने तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर येताच पीडितेला ही बाब समजली, यावेळी चौहान याने तुझा व्हिडीओ काढला असून, तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने याबाबत कुठेच वाच्यता केली नाही. त्यानंतर, चौहान याने काही दिवसांनंतर पुन्हा पीडितेला शाळा सुटल्यानंतर तामसा बस स्थानक परिसरात असलेल्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने कोणता व्हिडीओ आहे, याबाबत विचारणा केली असताना, चौहान याने व्हिडीओ दाखविला नाही. त्यानंतरही अनेक वेळा चौहान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. त्यात पीडिता गर्भवती राहिली. ही बाब चौहान याला समजल्यानंतर नांदेडातील एका रुग्णालयात आणून तिचा गर्भपात करण्यात आला. १० फेब्रुवारी राेजी पीडितेचे मामा तिला नेण्यासाठी गावात आले असताना पीडितेच्या आईने चौकशी केली. त्यानंतर, पीडितेने आपबिती सांगितली. या प्रकरणात तामसा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक राजूसिंह चौहान याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित शाळा राजकीय व्यक्तीचीगेल्या अनेक महिन्यांपासून मुख्याध्यापक विद्यार्थिनीवर अत्याचार करीत होता. त्यात काही दिवसांपूर्वीच ही बाब उघडकीस आली, परंतु संबंधित शाळा ही राजकीय पुढाऱ्याशी संबंधित असल्यामुळे कारवाईसाठी चालढकल करण्यात येत होती. शेवटी बुधवारी पहाटे या प्रकरणात गुन्हा नोंद झाला.

नांदेडात केला गर्भपातमुख्याध्यापकाने अत्याचार केल्याने विद्यार्थिनी गर्भवती झाली होती. ही बाब तिने मुख्याध्यापकाला सांगितली. अगोदर त्याने त्याच्याजवळील गोळी दिली, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. म्हणून तिला कारमध्ये बसवून नांदेडात आणण्यात आले होते. या ठिकाणी एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनीचा गर्भपात नेमका कोणत्या रुग्णालयात झाला, याचाही पोलिसांकडून आता तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडsexual harassmentलैंगिक छळTeacherशिक्षक