शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

कॉफीच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे; कॅफेत आढळल्या अंधाऱ्या खोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 17:13 IST

कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करीत आहेत.

ठळक मुद्देकॉफी शॉपमध्ये स्टोव्ह आणि दोन कप एवढेच साहित्य आढळून आले

नांदेड :  शहरातील कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे ( obscene activity in Coffee Shop ) सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आता अशा कॉफी शॉपवर धाडी ( Raid on Coffee Shops ) टाकण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी मुसलमानवाडी पाटीजवळ असलेल्या लव्ह बर्ड कॉफी शॉपवर धाड मारुन तरुण-तरुणीला पकडण्यात आले. या प्रकरणात कॉफी शॉपच्या चालकावर कारवाई करण्यात आली.

शहरात कॉफी शॉपचा सुळसुळाट झाला आहे. या कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करीत आहेत. एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपयापर्यंत शुल्क त्यासाठी आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कॉफी शॉपमध्ये चहा किंवा कॉफीचे कुठलेही साहित्य नाही. गुरुवारी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद नगर भागात असलेल्या दोन कॉफी शॉपवर धाड टाकण्यात आली होती. यावेळी आठ तरुण आणि सहा तरुणींना पकडण्यात आले.

यावेळी कॉफी शॉपमध्ये स्टोव्ह आणि दोन कप एवढेच साहित्य आढळून आले. त्यानंतर शुक्रवारी नांदेड ग्रामीण पोलीस आणि इतवारा उपविभागाच्या दामिनी पथकाने संयुक्तपणे लव्ह बर्ड या कॉफी शॉपवर धाड टाकली. त्यात एक तरुण आणि एक तरुणी अश्लील चाळे करताना आढळले. यावेळी सुनील मुकिंदराव बेरुळकर या चालकाला पकडले. या कारवाईत सपोनि संकेत दिघे, दामिनी पथकाच्या पोउपनि पी.आर.बाभळे, उज्ज्वला  दिग्रसे, राजेश माने यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी