शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मराठवाड्यातील १५ हजार ६७८ अंगणवाड्यांमध्ये पोषण महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:38 IST

केंद्र शासन व जागतिक बँकेच्या सहाय्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची राज्यातील ३० जिल्ह्यांतील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रामध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून यात मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील १५ हजार ६७८ अंगणवाड्यांचा समावेश आहे़ यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली असून अंगणवाडी कार्यकर्त्या दररोज दैनंदिन आहार वाटपाची छायाचित्रे या अ‍ॅप्लीकेशनवर पाठविणार आहेत़

ठळक मुद्देकार्यकर्ती दैनंदिन आहार वाटपाचे फोटोग्राफ पाठविणार

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र शासन व जागतिक बँकेच्या सहाय्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची राज्यातील ३० जिल्ह्यांतील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रामध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून यात मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील १५ हजार ६७८ अंगणवाड्यांचा समावेश आहे़ यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली असून अंगणवाडी कार्यकर्त्या दररोज दैनंदिन आहार वाटपाची छायाचित्रे या अ‍ॅप्लीकेशनवर पाठविणार आहेत़केंद्र शासनाने राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून आता पोषण अभियान असे नामकरण केले आहे़ या अभियानांतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यातील ४४४ प्रकल्पामधील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रामध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ तर उर्वरित सहा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात हे अभियान राबवण्यात येणार आहे़ या अभियानासाठी केंद्र शासनाने ८० व राज्य शासनाने २० टक्के प्रमाणे निधी उपलब्ध करून दिला असून अंमलबजावणीकरिता ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आणि खाद्य पोषण आहार बोर्ड या आठ विभागांची नोडल एजन्सी म्हणून घोषणा केली आहे़शून्य ते सहा वर्ष बालकामधील बुटकेपणाचे प्रमाण आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकामधील कुपोषणाचे प्रमाण सहा टक्क्यावरून दोन टक्क्यावर आणणे, ६ ते ५९ महिने या वयोगटातील बालकांमधील तसेच १५ ते ४९ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यावरून प्रतिवर्ष ३ टक्क्यावर आणणे तसेच जन्मजात कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण ६ टक्क्यावरून २ टक्क्यावर आणण्यासाठी सदर अभियान राबविण्यात येत आहे़या अनुषंगाने राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी या योजनेत सहभागी असलेल्या जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला असून या योजनेला तातडीने गती देण्याचे निर्देश दिले आहेत़ योजनेच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील १५ प्रकल्पांतर्गत ३ हजार ३३२, हिंगोली - ७ प्रकल्पांतर्गत १ हजार ९०, जालना - १३ प्रकल्पांतर्गत २ हजार १९७, उस्मानाबाद - ११ प्रकल्पांतर्गत २ हजार ५६, परभणी - १२ प्रकल्पांतर्गत १ हजार ८५३ तर नांदेड जिल्ह्यातील १९ प्रकल्पांतर्गत ४ हजार १६० अंगणवाडी केंद्रामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे़मुख्य सचिवांनी साधला व्हिडीओ कॉन्फरसद्वारे संवाद‘सही पोषण देश रोशन’ ही केंद्रपुरस्कृत योजना नांदेडसह राज्यातील ३० जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे़ या योजनेच्या अनुषंगाने मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे जिल्हाधिकाºयांसह जिल्हापषिदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांसोबत संवाद साधला़ ही योजना राबविण्यासाठी ८ विभाग एकत्रित प्रयत्न करणार आहेत़ त्यामुळे या आठही विभागात समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़ याबरोबरच योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले़ ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस साजरा करण्याबरोबरच आरोग्य व पोषण या विषयावरील प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करण्यास सांगितले़ समुदायआधारीत कार्यक्रमावर भर द्या, प्रभातफेºयांसह पोषण विषयावरील चित्रफिती शाळामध्ये दाखवा, चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत लोकजागृती व्हावी यासाठी एकत्रित गृहभेटी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़सेविकांना डाटा प्लॅनसह मोबाईल पुरविणारया योजनेसाठी ३० जिल्ह्यातील ८५ हजार ४५२ अंगणवाडी सेविकांना सीमकार्ड डाटा प्लॅनसह पुरविण्यात येणार आहे़ या बरोबरच अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व हेल्प डेस्कसाठी विविध तीन अ‍ॅप्लीकेशन तयार करण्यात आली असून या अंतर्गत अंगणवाडी सेविकामार्फत त्यांच्या केंद्रातील नियमित माहिती दैनंदिन पद्धतीने भरण्यात येणार आहे़ राज्यातील सर्व लाभार्थ्यांचे आधार बेसड् रजिस्ट्रेशन करण्यात येणार असून यामार्फत अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन आहार वाटपाचे फोटोग्राफ या अ‍ॅप्लीकेशनवर पाठविणार आहेत़ यासाठी ५ टक्के अतिरिक्त मोबाईल खरेदी करण्याचे नियोजन असून ८९ हजार ७२५ मोबाईल खरेदी करून ते अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षकांना देण्यात येणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाfoodअन्नStudentविद्यार्थी