नर्सरी, केजीच्या ६४ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:43+5:302021-05-25T04:20:43+5:30
चौकट - वर्षभर कुलूप, यंदा? १.मागील वर्षभरापासून शाळा बंद आहे. मुलांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मुलांचे ...

नर्सरी, केजीच्या ६४ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच
चौकट - वर्षभर कुलूप, यंदा?
१.मागील वर्षभरापासून शाळा बंद आहे. मुलांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. आगामी वर्षही असेच जाणार असल्याने शाळेचे भविष्यच अंधारात आहे. - रवी घोडके, संस्थाचालक.
२. आगामी वर्षातही शासनाकडून निर्बंध राहतील. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षातही ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारेच मुलांना शिकवावे लागणार आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असले तरी त्यादृष्टीने नियोजन करावे लागेल. - बी. कच्छवे, संस्थाचालक.
३.आगामी वर्षात तरी मुलांना शाळेत जावून शिकता येईल, असे वाटत होते. मात्र, मार्चनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने पुढील शैक्षणिक वर्षावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. - मधुकर उन्हाळे, संस्थाचालक
पालकही परेशान
१. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून मुले घरात बसून कंटाळलेली आहेत. त्यांना बाहेर पडण्याची घाई झाली आहे. मात्र, कोरोनामुुळे पुन्हा हे वर्ष असेच जाणार आहे. - संजय शिंदे, पालक
२.मुलांची एबीसीडीसुद्धा विसरून गेली आहे. ऑनलाईन शिक्षण दिले जात असल्याने मुले मोबाइलमध्ये दंग आहेत. आता तर पुन्हा सलग दुसरे वर्षसुद्धा असे जाणार आहे. - रमेश भराडे, पालक
३. मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. शाळेत जाण्याची सवय मोडली आहे. मुलांना पुढील वर्गात प्रवेश दिला जात आहे. मात्र त्यांची गुणवत्ता कमी झाली आहे. - प्रवीण सेलूकर, पालक
चौकट-
मुलांच्या मानसिकेचा विचार करूनच पालकांनी आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करावे. हा संक्रमणाचा काळ आहे. अशावेळी लहान थाेरांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम मनावर हाेत आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेतली पाहिजे. - डाॅ. रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ.