कुपोषित बालकांचा आकडा ४००
By Admin | Updated: May 14, 2014 01:14 IST2014-05-14T00:17:41+5:302014-05-14T01:14:18+5:30
सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील चालू ३३४ अंगणवाड्यांतील २५ हजार बालकांपैकी ३८२ विद्यार्थी नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित होते.

कुपोषित बालकांचा आकडा ४००
सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील चालू ३३४ अंगणवाड्यांतील २५ हजार बालकांपैकी ३८२ विद्यार्थी नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित होते. हा आकडा कमी होण्याऐवजी पाच महिन्यांत या आकड्यात १८ बालकांची वाढ झाली आहे. याविषयी संबंधित खाते अनभिज्ञ आहे. तालुक्यातील २८२ अंगणवाडी व ८२ मिनी अंगणवाडीमध्ये २५ हजार विद्यार्थी शालेय शिक्षणापूर्वीचे धडे गिरवितात. २०१३ मध्ये कुपोषणमुक्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याला भरपूर यश मिळाले परंतु जानेवारीपासून हे अभियान थंड पडले व कुपोषित बालकाची संख्या अभियानात झपाट्याने कमी झाली. तशीच अभियान बंद होताच झपाट्याने वाढली. कुपोषणमुक्तीसाठी पंचसूत्री अंमलात आणली होती. महिन्यापर्यंत केवळ स्तनपानाच प्रमाण ८० टक्यापर्यंत वाढविणे, ६ महिने ते २४ महिने वयोगटात आईच्या स्तनपानासोबत बालकांच्या आहारातील विविधता व गुणवता वाढविणे. मुलीमधील रक्ताक्षयाचे प्रमाण ५० टक्यांनी कमी करणे, जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करणे, बालकाच्या जन्मानंतर तत्काळ स्तनपानास सुरुवात आणि सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानाचे प्रमाण ८० टक्यापर्यंत वाढविणे व अति कुपोषित सर्व बालकांना उपचारात्मक आहाराचे व्यवस्थापन तसेच विशिष्ट उपचाराच्या माध्यमाचे व्यवस्थापन करणे.या पंचसूत्री प्रमाणे कुपोषणमुक्ती अभियान राबविले गेले. नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित बालकाची एकूण संख्या २०५९ एवढी होती. कमी वजनाचे बालके एवढी होती तर तीव्र कुपोषित ३८२ बालके होते. ही संख्या पुन्हा घटायला पाहिजे होती. परंतु ती वाढली (४००) आहे. याचे प्रमुख कारण अंगणवाडीताईचा संप त्यानंतर नवीन अंगणवाडी भरती व नंतर लोकसभा निवडणूक यामुळे याकडे दुर्लक्ष झाले. निमगाव प्राथमिक केंद्रांतर्गत सावरगाव (माळ) या एका गावात २५ बालके आहेत. पूर्वी ही संख्या १८ ते २० वर होती. याविषयी पर्यवेक्षिका जे. डी. केंद्रे यांना विचारपूस केली असता उन्हामुळे बालकाचे वजन कमी होते. उन्हाळ्यात बालके पोषक आहार घेत नाहीत. पिण्याचे पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेही कुपोषण वाढते. उन्हाळा संपताच हा आकडा खाली येईल परंतु मध्यंतरी या बालकांच्या जीवनाला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालक करीत आहेत.