जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, गुरुवारी २०१ नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:50+5:302021-05-28T04:14:50+5:30
जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार २३६ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २ हजार ९४२ अहवाल निगेटिव्ह तर २०१ अहवाल पॉझिटिव्ह ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, गुरुवारी २०१ नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू
जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार २३६ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २ हजार ९४२ अहवाल निगेटिव्ह तर २०१ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्रातील ५० रुग्ण आढळून आले. तर नांदेड ग्रामीण ९, भोकर ५, बिलोली २, देगलूर ४, धर्माबाद ३, हिमायतनगर ३, कंधार १, किनवट ८, लोहा २, मुदखेड ४, मुखेड ७, नायगाव १, उमरी १, हिंगोली ३ आणि परभणी जिल्ह्यातील १ रुग्ण आढळला. अँटिजन तपासणीत मनपा क्षेत्रात ५३, नांदेड ग्रामीण १५, अर्धापूर १, भोकर ३, बिलोली २, हदगाव ३, कंधार २, किनवट ३, लोहा १, माहूर १, बारड ७, मुखेड ३, नायगाव १, परभणी १ व हिंगोली येथे १ बाधित आढळला.
गुरुवारी ४ मृत्यूही झाले. त्यात नांदेड येथील ७२ वर्षीय महिला, देगलूर तालुक्यातील तमलूर येथील ६९ वर्षीय पुरुष, अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील ५३ वर्षीय पुरुष आणि बिलोली तालुक्यातील दुगाव येथील ४९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या २४० रुग्णांमध्ये विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७, भोकर कोविड केअर सेंटर १६, मुखेड ६, उमरी २, मुदखेड ७, माहूर ९, किनवट १२, धर्माबाद १०, बिलोली ६, लोहा ४ आणि खाजगी रुग्णालयातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. त्याचवेळी मनपाअंतर्गत गृह विलगीकरण, एनआरआय भवन, जम्बो कोविड सेंटर येथील ९० रुग्णही बरे झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या १ हजार ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ५३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ४८, नवी इमारत ३९, बारड कोविड केअर सेंटर १०, किनवट २८, मुखेड ८, देगलूर १६, कंधार ३, नायगाव ५, उमरी ४, माहूर ३, हदगाव ६, लोहा ८, धर्माबाद १२, मुदखेड १६, मालेगाव ८, बिलोली १७, हिमायतनगर १, एनआरआय भवन २०, मांडवी १४, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर ८ आणि खाजगी रुग्णालयात १६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मनपाअंतर्गत ४२७ व विविध तालुक्यांतर्गत ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत.