आता घरी थांबून नातेवाइकांचे घेता येईल अंत्यदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:19+5:302021-04-30T04:22:19+5:30
कोरोनामुळे मृत्त झालेल्या रुग्णावर येथील गोवर्धन घाटावरील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पालिका आणि स्थानिक हॅपी क्लबने यासाठी आजवर ...

आता घरी थांबून नातेवाइकांचे घेता येईल अंत्यदर्शन
कोरोनामुळे मृत्त झालेल्या रुग्णावर येथील गोवर्धन घाटावरील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पालिका आणि स्थानिक हॅपी क्लबने यासाठी आजवर पुढाकार घेतलेला आहे. मात्र, कोरोना आजारामुळे नातेवाइकांना अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहता येत नाही. तर बाहेरगावी असलेल्या अनेकांना या परिस्थितीमुळे येता येत नाही. अशा स्थितीत प्रिय व्यक्तीचे घरी राहून अंत्यदर्शन घेता यावे यासाठी एक लिंक व पासवर्ड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे देशासह परदेशातही असणाऱ्या जवळच्या नातलगांना आहे तेथून अंत्यदर्शन घेता येईल. पुढील तीन ते चार दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. यासाठी लोकसहभाग मिळाला नसला तरी स्वखर्चातून हे काम मार्गी लावणार आहोत. अशा पद्धतीने अंत्यदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणारी गोवर्धन घाट ही राज्यातील पहिलीच स्मशानभूमी असावी, असेही हर्षद शहा म्हणाले.