शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

आता नांदेड-तिरूपती थेट विमान सेवा; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 19:33 IST

Nanded-Tirupati direct flight : नांदेड येथे गुरू-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देमंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई - कोल्हापूर असा प्रवास करणार सदरील तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल.

नांदेड - आंध्रप्रदेश राज्यातील श्री तिरूपती बालाजी (Tirupati Balaji Mandir) देवस्थानचे जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जात असतात. तिरूपतीला जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी अशी मागणी भाविकांची होती. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Minister Ashok Chavan ) मोठ्या प्रयत्नात होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता नांदेड - तिरूपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. (Now Nanded-Tirupati direct flight; Success to the efforts of Guardian Minister Ashokrao Chavan)

नांदेड येथे गुरू-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद,   अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरूपतीची भर पडली आहे. नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून होती. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ट्रुजेट विमान कंपनीशी अनेकदा चर्चा केली होती. त्याचीच फलश्रृती म्हणून सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई - कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे. सदरील तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे. त्यानंतर मुंबई - कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले.  पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  

'बिगानिया, चव्हाण गया, अब मै हु डॉन'; खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडtourismपर्यटनairplaneविमानtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट