शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

आता नांदेडहून मुंबई आणि गोवा फक्त एका तासावर!; बहुप्रतीक्षित विमानसेवा लवकरच सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:11 IST

आठवड्याचे सातही दिवस असणार उपलब्ध; सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. आता मुंबई आणि गोवा या दोन मार्गांचा समावेश झाल्याने एकूण सात विमानसेवा उपलब्ध होतील.

नांदेड : नांदेड–मुंबई आणि नांदेड–गोवा या बहुप्रतीक्षित विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नांदेड–मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबईऐवजी मुंबईतील मुख्य विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली होती, ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.

खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, या दोन्ही विमानसेवांचे संचालन स्टार एअर ही कंपनी करणार असून, या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. मुंबई–नांदेड विमान दुपारी ४:४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५:५५ वाजता नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. त्याच विमानाचे सायंकाळी ६:२५ वाजता नांदेडहून उड्डाण होऊन रात्री ७:३५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. गोव्याच्या मोपा विमानतळावरून नांदेडला येणारे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करून १ वाजता नांदेडला पोहोचेल, तर परतीचे उड्डाण दुपारी १:३० वाजता होऊन गोव्याला २:४० वाजता पोहोचेल. त्यामुळे आता नांदेडकरांना मुंबई अन् गोवा तासभराच्या अंतरावर असेल.

नांदेडसह शेजारील जिल्ह्यांनाही लाभया दोन्ही विमानसेवेमुळे नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीस्कर विमानसेवा मिळणार आहेत. विशेषतः मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याने व्यावसायिक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच नांदेड–गोवा विमानसेवा सुरू झाल्याने पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. आता मुंबई आणि गोवा या दोन मार्गांचा समावेश झाल्याने एकूण सात विमानसेवा उपलब्ध होतील.

तिरूपती, शिर्डीसाठीही प्रयत्नपुढील काळात नांदेडहून तिरूपती, शिर्डी आणि कोल्हापूरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक यांसंबंधी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर विविध मागण्या मांडल्या असून त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded to Mumbai, Goa in One Hour; Flight Service Starts

Web Summary : Nanded will have direct flights to Mumbai and Goa starting November 15th. Star Air will operate daily flights. This will benefit travelers from Nanded and neighboring districts, boosting both business and tourism. More routes are planned.
टॅग्स :Nandedनांदेडairplaneविमानtourismपर्यटन