शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे भाकीत; आता अशोक चव्हाणांना आजीवन काँग्रेसमध्येच राहावं लागेल

By शिवराज बिचेवार | Updated: May 9, 2023 18:05 IST

आता बजरंग दलाचे सेवक पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या पराभवासाठी तुटून पडतील

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग दलावर टीका केली. बजरंग दल हा सेवाभावी वृत्तीने काम करतो. त्यामुळे चव्हाणांनी केलेली टीका त्यांना अडचणीची ठरणार असून, ते या टीकेमुळे आजीवन काँग्रेसमध्येच राहतील, असे दिसून येत असल्याचे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

अशोकराव चव्हाण हे भाजपच्या संपर्कात नाहीत. काही महिन्यांपूर्वी अधिवेशनादरम्यान त्यांची आणि माझी भेट झाली होती. सध्या तरी चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या कोणत्याही हालचाली नाहीत. परंतु, कर्नाटक निवडणुकीत त्यांनी बजरंग दलावर केलेली टीका त्यांना चांगलीच अडचणीची ठरू शकते. यापूर्वी लोकसभेत त्यांचा पराभव झाला आहे. आता बजरंग दलाचे सेवक पुन्हा एकदा त्यांच्या पराभवासाठी तुटून पडतील, असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चार दिवसांत सत्ताधाऱ्यांचे ढोलताशे बंद होतील, असे वक्तव्य केले होते. वडेट्टीवारांना मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहेत. परंतु, आता ते खूप दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थ उरत नाही, असेही बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNandedनांदेडBJPभाजपा