शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सोशल मीडियावरुन प्रचार केल्याप्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:29 IST

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अ‍ॅडमीन व उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

नांदेड : नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अ‍ॅडमीन व उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत.सोशल मिडियावर नजर ठवेण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून वरील सर्व प्रसार माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे.या प्रक्रियेत उमेदवारांना मतदान करण्याविषयी करण्यात आलेले आवाहन याबाबत तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीत शैलेश नंदकुमार मुखेडकर यांनी वायजर टेक्नॉलॉजी, नांदेड येथून भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्रित संदेश वितरीत केले आहेत. माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीने हे संदेश पकडले आहेत. त्यानुसार मुखेडकर यांनी समितीची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. संबंधित उमेदवारांनी खर्चात या प्रकरणी नोंद केली नसल्याचेही लक्षात आले आहे.व्हॉट्सअप परिवर्तन ग्रुपवरुन कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलविल्याचा संदेश देण्यात आला होता. या प्रकरणी ग्रुप अ‍ॅडमीन डॉ. मनीषा कागडे तसेच सकल मराठा शिवजन्मोत्सव ग्रुपवरुन कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयी करण्यासंदर्भातला संदेश देण्यात आला होता. या ग्रुपमधील डॉ. स्मिता गायकवाड, जयश्री पावडे, व्यंकटेश मंगनाळे, संगीता पाटील, प्रतिमा पाटील, सुरेखा रावणगावकर, राजश्री मिरजकर, अविनाश कदम पाटील यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच फेसबुकवरुन विविध उमेदवारांना निवडून देण्यासंदर्भात प्रचार करण्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.अशा युझरकत्यांना या समितीने नोटीसा बजावल्या आहेत. प्रभाकर पांडे, वंचित बहुजन आघाडी नांदेड आॅफिशियल फेसबुक, नांदेड सोशल मिडीया भाजपा यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडियाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग