१९ केंद्राध्यक्षांसह ८३ कर्मचाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:12+5:302020-12-30T04:23:12+5:30

लोहा : लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्यासाठी ...

Notice to 83 employees including 19 Central Presidents | १९ केंद्राध्यक्षांसह ८३ कर्मचाऱ्यांना नोटिसा

१९ केंद्राध्यक्षांसह ८३ कर्मचाऱ्यांना नोटिसा

लोहा : लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्यासाठी शनिवारी मतदान कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यात १९ केंद्राध्यक्ष व ६४ इतर क्र. १, २ व ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली, अशा एकूण ८३ कर्मचाऱ्यांना तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, २४ तासांच्या आत समक्ष खुलासा सादर केला नाही तर गुन्हा दाखल करण्याचे बजावले आहे.

लोहा तालुक्यात ८४ ग्रामपंचायतींमध्ये ७७४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जवळपास १ लाख ७० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान बूथनिहाय एक केंद्राध्यक्ष व त्यांना सहायक मतदान अधिकारी एक, दोन व तीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यात १९ मतदान केंद्राध्यक्ष, ६४ इतर अधिकारी गैरहजर होते. त्या सर्वांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा करावा, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. खुलासा सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाला दांडी

सोमवारी दिवसभरामध्ये किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले याची माहिती मिळू शकली नाही. कोणताही अधिकारी फोन उचलत नव्हता. अनेक अधिकाऱ्यांचे मोबाइल नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवीत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती हाती आली नाही.

Web Title: Notice to 83 employees including 19 Central Presidents