शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नांदेड मनपाच्या ११३ लेटलतिफांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:21 IST

महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर आयुक्त लहुराज माळी यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा बडगा उगारला होता़ परंतु, आयुक्तांच्या कारवाईनंतरही ‘हम नही सुधरेंगे’ या भूमिकेत असलेले कर्मचारी मर्जीप्रमाणे वागत आहेत़ शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी केलेल्या पाहणीत तब्बल ११३ कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले़ या सर्व लेटलतिफ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़

ठळक मुद्देसहाय्यक आयुक्तांच्या पाहणीत उघड झाला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर आयुक्त लहुराज माळी यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा बडगा उगारला होता़ परंतु, आयुक्तांच्या कारवाईनंतरही ‘हम नही सुधरेंगे’ या भूमिकेत असलेले कर्मचारी मर्जीप्रमाणे वागत आहेत़ शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी केलेल्या पाहणीत तब्बल ११३ कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले़ या सर्व लेटलतिफ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लहुराज माळी यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा हजेरीपट ताब्यात घेतला होता़ यावेळी शंभरावर कर्मचारी निश्चित वेळेत कार्यालयात आलेच नसल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर आयुक्तांनी या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याबाबत तंबी दिली होती़ त्यानंतर दुसऱ्यांही दिवशी अनेक कर्मचारी कार्यालयात वेळेवर आलेच नाही़त्यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या़ त्यानंतर मध्यंतरी कारवाईच्या भीतीने का होईना लेटलतिफ कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली होती़ परंतु, लेटलतिफ कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत बदल झाला नसल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा दिसून आले़आस्थापना विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता विविध विभागांना भेटी दिल्या़ त्यावेळी ११३ कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले़ त्यामध्ये अनेक विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश होता़ लेटलतिफ असलेले हे कर्मचारी ११ वाजेनंतर कार्यालयात आले होते़ त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे़ कार्यालयीन शिस्त न बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे संधू यांनी स्पष्ट केले आहे़ या कर्मचाऱ्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर तो असमाधानकारक वाटल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे़, असा इशाराही सहाय्यक आयुक्त अजितपालसिंग संधू यांनी दिला आहे़---आयुक्तांची दहाला, कर्मचाऱ्यांची साडेअकराला हजेरीमनपा आयुक्त म्हणून दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले लहुराज माळी हे दररोज सकाळी १० वाजता न चुकता कार्यालयात पोहोचतात़ परंतु, महापालिकेचे कर्मचारी, अनेक विभागप्रमुख सकाळी ११ वाजेनंतरच कार्यालयात पाऊल ठेवतात़ खुद्द आयुक्तांनी लेटलतिफांना नोटीस बजावल्यानंतरही त्याचा या कर्मचाऱ्यांवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाcommissionerआयुक्तEmployeeकर्मचारी