आजपासून असहकार आंदोलन

By Admin | Updated: May 13, 2014 01:17 IST2014-05-12T23:59:07+5:302014-05-13T01:17:59+5:30

नांदेड: स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने मंगळवारपासून शासनाच्या विरोधात आर्थिक असहकार आंदोलन करण्यात येणार आहे़

The Non-Cooperation Movement From Today | आजपासून असहकार आंदोलन

आजपासून असहकार आंदोलन

नांदेड: स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने मंगळवारपासून शासनाच्या विरोधात आर्थिक असहकार आंदोलन करण्यात येणार आहे़ यासंदर्भात सोमवारी सायंकाळी ७ वाजता कापड मार्केट हॉल, जुना मोंढा येथे सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक पार पडली़ यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आ़ ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दुल सत्तार, व्यापारी महासंघाचे सचिव हर्षद शहा, कार्याध्यक्ष एकनाथ मामडे, राजेंद्र हुरणे, मधुकर मामडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ नांदेड महापालिकेने एलबीटीचे सुधारित कर लागू केल्यानंतर व्यापार्‍यांनी या निर्णयाला विरोध केला़ मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत एलबीटी वसुली सुरूच ठेवली़ एलबीटीच्या विरोधात पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आर्थिक असहकार आंदोलनाद्वारे व्यापारी शक्तिप्रदर्शन करणार आहेत़ याबाबत माहिती देताना व्यापारी महासंघाचे सचिव हर्षद शहा म्हणाले, शासनाने एलबीटी रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून राज्यभर आर्थिक आंदोलन करण्यात येत आहे़ नांदेड शहरात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल़ एकीकडे एलबीटी रद्द करण्याची मागणी असतानाच महापालिकेने एलबीटी करात वाढ करून व्यापार्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे़ त्यामुळे सुधारित कर प्रणालीला विरोध करण्यात येणार आहे़ शहरातील व्यापारी उद्यापासून महापालिकेकडे एलबीटी नाममात्र १० रूपये भरून आर्थिक असहकार आंदोलन करीत आहेत़ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील २६ मनपा क्षेत्रातील व्यापारी संघटना आर्थिक असहकार आंदोलनात उतरल्या आहेत़ बैठकीस महापौर अब्दुल सत्तार यांनी उपस्थिती दर्शवून सर्व नगरसेवक व्यापार्‍यांच्या बाजूने असल्याचे सांगितले़ मनपा प्रशासनाने एलबीटी सुधारित कर प्रणालीचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींना विश्वास न घेताच शासनाकडे पाठविला़ त्यामुळे एलबीटी कर वाढीचा निर्णय परस्पर घेण्यात आला़ या निर्णयाला आमचा विरोध असल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले़ आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांनी सुद्धा एलबीटीला विरोध दर्शवित लोकप्रतिनिधी व्यापार्‍यांच्या सोबत असल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी) शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार राज्यातून एलबीटी रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहे़ त्यात नांदेडचे महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह परभणी व लातूरचे महापौर सुद्धा सहभागी होणार असल्याचे हर्षद शहा यांनी सांगितले़

Web Title: The Non-Cooperation Movement From Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.