समस्या सुटेना रिक्त जागा भरणे ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:13+5:302020-12-29T04:16:13+5:30

▪️माहूरच्या तहसील कार्यालयात रिक्त पदांमुळे नागरिकांची ससेहेलपट माहूर : माहूर तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रासाठी व शेतीविषयक नुकसान आणि अनुदानसंदर्भात ...

No need to fill in the blanks | समस्या सुटेना रिक्त जागा भरणे ना

समस्या सुटेना रिक्त जागा भरणे ना

▪️माहूरच्या तहसील कार्यालयात रिक्त पदांमुळे नागरिकांची ससेहेलपट

माहूर :

माहूर तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रासाठी व शेतीविषयक नुकसान आणि अनुदानसंदर्भात नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असताना तहसील कार्यालयातील एकूण तीन नायब तहसीलदारांच्या जागांपैकी दोन जागा रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वेळेवर कामाचा निपटारा होत नाही. पयार्याने नागरिकांतून नाराजीचा आणि तक्रारींचा सूर उमटत आहे.

महसूल विभागामध्ये निवासी नायब तहसीलदार हे महत्त्वाचे पद मानले जाते. त्याचबरोबर पुरवठा विभाग आणि निवडणूक नायब तहसीलदार ही पदेही महत्त्वाची असतात. तहसीलदारांना सहायक म्हणून त्यांचे काम असते. निवासी नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने विविध कामांचा निपटारा केला जातो. कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पद करते. त्यामुळे कार्यालयात सुसूत्रता आणि शिस्त येते; परंतु तेच पद रिक्त असल्यामुळे तहसील कार्यालयात सध्या अव्वल कारकून पदाचे कर्मचारी स्वतःला तहसील कार्यालय केवळ आपल्या एकट्यामुळेच सुरू आहे. या तोऱ्यात वागत असल्याने नागरिकांना छोट्या छोट्या कामासाठी अनेक वेळा कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. यातूनच वाद- विवाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या व क्षेत्रात मिळणाऱ्या माहूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पद मागील दोन वर्षांपासून रिक्त असल्याने महसूल १ व महसूल २ ही पदे त्वरित भरावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: No need to fill in the blanks