शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी प्रधानमंत्री व्हावेत; शिंदे गटाच्या खासदाराचे रेणुका मातेला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 17:50 IST

शिंदे गट - भाजपा राज्यात सत्तेत आहेत, यामुळे खा. पाटील यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे.

नांदेड: देशभरातील चकाचक रस्ते पाहून सर्वसामान्य नागरिकांसोबत रिक्षावालेसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेतात. आगामी काळात भारत देशाला नितीन गडकरी यांच्या रूपाने मराठी पंतप्रधान लाभावा, असे रेणुकामातेला साकडे घातल्याचे खा. हेमंत पाटील यांनी जाहीर भाषणात सांगितले. शिंदे गटाच्या खासदाराने गडकरी यांच्यासाठी साकडे घातल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. ते माहूर येथील कार्यक्रमात बोलत होते.

नुकतेच केंद्रीतील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचेच नाव आघाडीवर घेतलं जाते. पक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षात देखील त्यांच्या कामाचे कौतुक करणारे कमी नाहीत. यात शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचे देखील नाव आहे. आज माहूर येथे स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खा. पाटील यांनी नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. त्यांच्या काळात देशात झालेल्या चकचकीत रस्ते पाहून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलसा मिळाला आहे. ऐवढेच नाही तर साधा रिक्षावाला देखील त्यांचे नाव घेतो. असा माणूस देशाच्या प्रधानमंत्री व्हावा. त्यांच्या रूपाने एक मराठी माणूस प्रधानमंत्री पदी लाभावा. यासाठी रेणुका मातेला साकडे घातल्याचे खा. पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. शिंदे गट - भाजपा राज्यात सत्तेत आहेत, यामुळे खा. पाटील यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे.

वर्षभरात काम संपवा, गडकरी यांच्या कडक सूचना ५१ कोटींच्या या स्कायवॉकचे काम करण्यास १८ महिने कशाला दिले हे मला समजले नाही. हे काम वर्षभरात पूर्ण करा मी एक वर्षाने मातेच्या दर्शनासाठी पुन्हा येईन तेव्हा स्कायवॉकने गडावर जाईल, अशी कडक सूचना केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यास यावेळी दिली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNandedनांदेडBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे