शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:33 IST

पुढच्या काळात वाहून जाणारे पाणी थेट मराठवाड्याच्या खोऱ्यात येईल आणि दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Devendra Fadnavis : नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नसल्याचा निर्धार केला आहे. मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही. पश्चिमी वाहिन्यांचे समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या खोऱ्यात आणून इथला दुष्काळ कायमस्वरूपी संपवून टाकणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि मुखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली.

"मराठवाड्याच्या खोऱ्यात पश्चिमी वाहिन्यांचे  पाणी आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने २०१९ सालीच घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या महाभकास आघाडी सरकारने आपली योजना गुंडाळून ठेवली होती. पुन्हा आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेला सगळ्या मंजुऱ्या देत निविदाही काढल्या. पुढच्या काळात वाहून जाणारे पाणी थेट मराठवाड्याच्या खोऱ्यात येईल आणि दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल. महायुती सरकारच्या काळात सिंचन योजनांची अनेक कामे झाली. आमदार डॉ. तुषार राठोड हे लेंडी योजनेचे काम घेऊन आले. त्यांना १६५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले. अशा अनेक योजना राबवत आपल्याला या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. डॉ. तुषार राठोड यांना यावेळी निवडून दिले तर त्यांना आमदार ठेवणार नाही तर मंत्रीपद दिले जाईल. त्याचप्रमाणे डॉ. संतुकराव हंबर्डे आल्यावर दिल्लीत जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना सर्व प्रकारची मदत करतील," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर लोकसंख्येच्या ५० टक्के असलेल्या महिलावर्गाला सामाजिक, आर्थिक, परिवर्तनाचा केंद्रबिंदू करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यासाठी मोदी सरकारने  महिलांसाठी 'बेटी बचाव, बेटी पढाओ'पासून लखपती दिदीपर्यंत १४ विविध प्रकारच्या योजना आणल्या. २०२८ पर्यंत आपल्याला राज्यात ५० लाख लखपती दिदी तयार करायच्या आहेत. त्यातील २५ हजार लखपती दिदी डॉ. तुषार राठोड तयार करतील. राज्यातील महायुती सरकारनेही मुलींसाठी शिक्षणासाठीच्या, महिलांसाठी माझी लाडकी बहीण, पन्नास टक्के दरात एसटी प्रवास अशा अनेक योजना आणल्या. अडीच कोटी बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा केले आहेत. आपल्या सरकारने पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका अशा प्रत्येक घटकाचे मानधन वाढवून प्रत्येकाला जगण्याचा त्याला आणि आता पुन्हा आपले मानधन वाढवून घेण्यासाठी महायुती सरकारला आशीर्वाद द्या," असेही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान, मोफत वीज, सौर पंप योजना अशा अनेक योजना राबविणारे महायुती सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचा देवेंद्र फडणवीसांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NandedनांदेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस