आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:38 IST2018-02-12T00:37:44+5:302018-02-12T00:38:11+5:30
जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़

आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
मांडवी (जि़नांदेड) : जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़
राज्यपाल विद्यासागर राव यांनी ११ फेब्रुवारी रोजी गावातील जल शुद्धीकरण सयंत्र, बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन, दालमील, शबरी घरकुलाचे उद्घाटन तर जवरला-मांडवी रस्ता व ग्रामीण क्रीडा संकुल उभारणीचे भूमिपूजन केले़
ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्यपाल यांनी आपण पहिल्या गाव भेट दौ-यात प्रस्तावित केलेल्या जवळपास सर्वच कामांची पूर्तता झाली असल्याचे व निजामकालीन राजवटीतला जवरला-आंबाडी-किनवट हा जुना रस्ता नव्याने तयार करून या गावास जोडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ निधीची कमतरता पडू देणार नाही़ पाण्याची बचत आणि त्याचा वापर याची पुरेपूर माहिती अवगत करून देण्यासाठी लवकरच पाणी फाऊंडेशनचे एक पथक येथे पाठविणार आहे़ यासंबंधी सिनेअभिनेता आमिर खान यांच्याशी माझे बोलणे झाले आहे़ मोबाईल क्रांती आणि त्याचा अतिरेक हे एका उदाहरणातून त्यांनी मांडले़ आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता ५ कोटींमधील ५ टक्के रक्कम आता थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होणार आहे़ असे सांगून आदिवासी गाव दत्तक प्रक्रियेतून मला त्यांच्या गरजा आणि समस्या या जवळून पाहता आल्याचा निर्वाळा दिला़
जवरला परिसरातील जवळपास २ हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फायदेशीर ठरत नाही़ ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन- तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत़ त्याला मंजुरी देवून सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ याप्रसंगी मंचावर राज्यपालांसमवेत वेणू गोपालरेड्डी, प्रा़ प्रदीप नाईक, रंजित कुमार, उल्हास मुडेकर, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, सरपंच भूपेंद्र आडे, महाजन माधव मरसकोल्हे, जि़प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, तहसीलदार नरेंद्र देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ उपस्थित होते़
प्रास्ताविक माधवराव पाटील यांनी केले़ प्रारंभी आदिवासी मुलींचे विद्यासंकुल पिंपळगाव येथील मुलींच्या नृत्यगीताने स्वागत झाले़
राज्यपालांनी केले विकास कामांचे उद्घाटन
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले़ विशेष केंद्रीय सहाय योजनेतून २ लाख रूपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरू केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले़ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून ७ लाख ५० हजार रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच २ कोटी ९५ लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले़ ९९ लाख ६२ हजार रूपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले़
किनवट तालुक्यातील आदिवासीबहुल जवरला हे गाव २९ मे २०१५ रोजी राज्यपालांनी गावसंवाद कार्यक्रमात हे गाव विकासाकरिता दत्तक घेतल्याचे जाहीर केले़ तेव्हापासून येथे कोणकोणती विकासकामे पूर्णत्वास गेली याची पाहणी करण्यात आली़
४खेळीमेळीच्या वातावरणात रिमझिम पावसाच्या गारव्यात अर्धा-पाऊण तास राज्यपालांचा संवाद कार्यक्रम चालला होता़
४हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि राज्यपालाच्या आगमनानंतर ११़३० वाजता पावसाच्या सरी बरसल्या़यामुळे उपस्थितांची चांगलीच धांदल उडाली़