शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात मराठवाड्यात २९ ‘टीएमसी’ ची नोंद हवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:32 IST

सध्या राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.

नांदेड : सध्या राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या जल परिषदेचे अध्यक्ष आहेत. आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असून या आराखड्यात मराठवाड्यात २९ टीएमसी पाणी शिल्लक आहे हे स्पष्टपणे नमूद करायला हवे, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, खोरे निहाय होणाऱ्या जल आराखड्यात दर्शविल्याप्रमाणेच यापुढे पाणी गृहित धरल्या जाईल. त्यात कोणाला बदलही करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी कंधार येथेच मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात २९ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे घोषित केले  होते. मात्र आता मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील कृतीगट या भागात पाणी उपलब्ध नसल्याचे सांगत आहे.

मुख्यमंत्र्यांनी ३० नोव्हेंबर २०१७ मध्ये गोदावरी खोरे जल आराखड्याला दिलेली मान्यता यात २९ टीएमसीचा स्पष्ट उल्लेख आहे. जलसंपदामंत्री यांचेही तसेच पत्र उपलब्ध असताना कृतीगट कसे काय पाणी उपलब्ध नसल्याचे सांगतो, असा सवाल करत राज्याच्या आराखड्यात २९ टीएमसीचा स्पष्ट उल्लेख हवा अशी मागणी चव्हाण यांनी केली. 

नांदेडवरील अन्याय सहन करणार नाहीमराठवाड्यातील पाणीप्रश्नासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी अप्पर पैनगंगेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केल्याचे सांगत सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत राज्यपालांचीही भेट घेतली असून त्यांनीही तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. 

शासनाच्या या निर्णयामुळे नांदेडसह परभणी, यवतमाळसह हिंगोली जिल्ह्याचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे १९६८ चे या प्रकल्पासंबंधीचे मूळ धोरण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. होऊ घातलेल्या सापळी धरणासाठीही वेगळा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. तेथील जमीन अधिगृहित न करता पाणी लिफ्ट करुन न्यायचा प्रस्ताव शासनापुढे आहे. हे करताना अप्पर पैनगंगेचे नुकसान होणार नाही. आमचे पाणी कायम राहील, याकडे शासनाने लक्ष द्यावे. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात कोणत्याही नवीन प्रकल्पाला मंजुरी देवून नांदेडकरांवर अन्याय करु नये अन्यथा यासंबंधी ठोस भूमिका घेऊ,असा इशाराही खा. अशोकराव चव्हाण यांनी शासनाला दिला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडState Governmentराज्य सरकारWaterपाणीMarathwadaमराठवाडा