ग्राहक निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:42+5:302020-12-28T04:10:42+5:30

अर्धापूर : सजग व जागृत ग्राहक निर्माण करण्यासाठी प्रबोधन व मार्गदर्शनाची गरज आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक मार्गदर्शन पुस्तिका ...

The need for awareness to create customers | ग्राहक निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची गरज

ग्राहक निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची गरज

अर्धापूर : सजग व जागृत ग्राहक निर्माण करण्यासाठी प्रबोधन व मार्गदर्शनाची गरज आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक मार्गदर्शन पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन तहसीलदार सुजित नरहरे यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राष्ट्रीय ग्राहक दिन साधेपणाने व ऑनलाइन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेत संघटना व ग्राहक जनजागृती या विषयावर माहिती देण्यात आली आहे.

‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र माहिती व कार्य दिशा’ या पुस्तिकेचे प्रकाशन तहसीलदार सुजित नरहरे यांनी दि. २५ रोजी केले. ग्राहक दिन, ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये या विषयांवर जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत मुळे यांनी माहिती दिली. प्रास्ताविक तालुका संघटक गुणवंत विरकर यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी शेख शफीओद्दिन, सखाराम क्षीरसागर, आनंद मोरे, शेख शकील आदी उपस्थित होते.

Web Title: The need for awareness to create customers