राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कोरोना छत्र हरविलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:54+5:302021-07-23T04:12:54+5:30
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जनजीवन प्रभावित झालेले आहे. या काळामध्ये कोरोनाने लहान मुलांचे आई-वडील दगावले आहेत. त्यामुळे या ...

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कोरोना छत्र हरविलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारणार
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जनजीवन प्रभावित झालेले आहे. या काळामध्ये कोरोनाने लहान मुलांचे आई-वडील दगावले आहेत. त्यामुळे या लहान मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे. सामाजिक दायित्व लक्षात घेता राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बालवयामध्ये आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतली आहे. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र दिले.
यावेळी माजी सभापती भाऊसाहेब देशमुख-गोरठेकर, सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरूणकर, प्रदेश युवक सरचिटणीस बाळासाहेब भोसीकर, जिल्हा कार्याध्यक्षा सुनंदा पाटील-जोगदंड, चिटणीस बालासाहेब मादसवाड, उपाध्यक्ष गजानन पांपटवार, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, चिटणीस देवराव टिपरसे, युवक कार्याध्यक्ष अॅड. सचिन जाधव, कार्याध्यक्ष बिलोली प्रा. नागनाथ खेळगे, युवतीच्या अध्यक्षा प्रियंका कैवारे पाटील, चिटणीस मधुकरराव पिंपळगावकर, रमेश गांजापूरकर, चिटणीस योगेश पाटील, तालुकाध्यक्ष उद्धवराव पाटील-राजेगोरे, नांदेड तालुकाध्यक्ष उत्तमराव पाटील आलेगावकर, इंजि. सुभाष रावणगावकर, प्रकाश मांजरमकर, सचिन देशमुख, साबेर शेख, आदींची उपस्थिती होती.