शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

नांदेडकरांना पाणीटंचाईच्या झळा कायम; सहा दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:28 IST

उपलब्ध पाण्याचेच करावे लागणार नियोजन

ठळक मुद्देसध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यता कमीच

नांदेड : महापालिकेने १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून नांदेडकरांना पुन्हा आठ दिवसानंतरच पाणी मिळणार आहे़  दुसरीकडे जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यताही मावळली आहे़ त्यामुळे  पाणीटंचाईचे संकट कायम आहे़महापालिकेच्या स्थायी समिती सभेत महापौर व सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला १६ आॅगस्टपासून चार दिवसांआड पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़

शहरात मागील चार महिन्यांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे़ जून, जुलै महिन्यात केवळ तीन ते चार दिवसांआड पाणी सोडण्यात आले होते़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात १६़९३ दलघमी साठा उपलब्ध आहे़ त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय  आयुक्त लहुराज माळी यांनी जाहीर केला होता़ यासंदर्भात १५ आॅगस्ट रोजी वृत्तपत्रातून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती़ मात्र त्यानंतर काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे आता नांदेडकरांना चार दिवसआड नव्हे तर सहा दिवसआड पाणी मिळणार आहे़ काही भागात सातव्या, आठव्या दिवशीही पाणी सोडण्यात येत आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून रात्री- बेरात्री नळाला पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिकांना नळाचे  पाणी मिळत नाही़ भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ काही भागात टँकरही सात, आठ दिवसानंतर येत असून त्यावर पाण्यासाठी झुंबड उडत आहे़ 

जायकवाडी धरणात १६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत १९९३़६८६ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून धरणाची टक्केवारी ९१़८३  एवढी आहे़ या धरणातून उजवा कालव्यात ९०० क्यूसेस तर डाव्या कालव्यात १४०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे़ पैठण जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेस विसर्ग सुरू आहे़ ढालेगाव बंधाऱ्यापर्यंत हे पाणी मिळणार आहे़ मात्र त्यापुढे विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ गोदावरी नदीपरिक्षेत्रातील पाऊसही बंद झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील मध्यम, लघु व मोठ्या बंधाऱ्याची स्थिती नाजूक आहे़ अर्धा पावसाळा संपला असून यापुढे जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पाचा साठा वाढण्याची शक्यता आहे़ मात्र या जर, तरच्या बाबी असून उपलब्ध साठ्यावरच पुढील चार महिने काढावे लागणार आहेत़ त्यासाठी मनपाने चार दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय रद्द केला आहे़ प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या बाबतीत गंभीर नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे़ 

सध्या शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात २० टक्के साठा उपलब्ध असून या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून ५० टक्के उपसा सुरू आहे़ सांगवी बंधाऱ्यातील पाण्यावरच पाणीपुरवठा सुरू आहे़ मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यामुळे धरणांची स्थिती नाजूक आहे़ त्यामुळे इतर शहरात  १० ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़ नांदेडमध्ये चार दिवसांआड पाणी सोडण्याचे नियोजन केले होते़ मात्र वरिष्ठांच्या निर्णयानुसार तो निर्णय रद्द करण्यात आला आहे़  - सुग्रीव अंधारे,कार्यकारी अभियंता महापालिका

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाRainपाऊस