शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नांदेडात गुटखा गोदामावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:20 IST

शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :शहर व जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री करण्यात येत आहे़ याबाबत रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ प्रशासनाच्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली असून या व्यवहाराची संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे़राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो़ शहर व जिल्ह्यात प्रत्येक पानटपरीवर गुटखा अगदी सहजपणे मिळतो़ गुटखाबंदीच्या निर्णयानंतर त्याच्या किमती मात्र वाढविण्यात आल्या आहेत़ नांदेड जिल्ह्यात शेजारील तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गुटखा आयात करण्यात येतो़दररोज गुटख्याचे ट्रक छुप्या मार्गाने नांदेडात दाखल होतात़ त्यामध्ये सीमावर्ती भागातील काहींच्या मेहरनजर मुळे गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण होत आहे़ दरम्यान, रविवारी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे यांना वाजेगांव परिसरात एका गोदामात गुटखा असल्याची खबºयाकडून माहिती मिळाली होती़त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री घाटे व त्यांच्या कर्मचाºयांच्या मदतीने दुपारी दिल्ली ट्रान्सपोर्ट या गोदामावर छापा मारण्यात आला़ मिर्झा महेबुब बेग मिर्झा मोहसिन बेग यांच्या मालकीचे हे गोदाम आहे़ गोदामात युके-३३०० या ब्रॅन्डचा तब्बल १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा आढळला़ ६० बॉक्समध्ये हा गुटखा ठेवण्यात आला होता़ पोलिसांच्या मदतीने हा सर्व गुटखा जप्त करण्यात आला़ त्यानंतर या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अटकही करण्यात आली आहे़जुन्या नांदेडात अड्डेगुटखा विक्रेत्यांचे जुन्या नांदेड परिसरात अनेक अड्डे आहेत़ जुन्या नांदेडातून शहरातील अनेक भागात गुटखा पाठविला जातो़ त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे़ यापूर्वी एका तक्रारकर्त्याने गुटखा अड्डयांची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली होती़ परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती़

टॅग्स :NandedनांदेडraidधाडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस