शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नांदेडात गोदावरी महामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:10 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष आमावस्यानिमित्त गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने १६ ते १८ जानेवारी या कालावधीत गोदावरी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवासाठी हजारो भाविक गोदावरीच्या विविध घाट, मठ, मंदिर, दर्गाह परिसरात उपस्थित राहणार असल्याचे समितीने कळविले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष आमावस्यानिमित्त गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने १६ ते १८ जानेवारी या कालावधीत गोदावरी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवासाठी हजारो भाविक गोदावरीच्या विविध घाट, मठ, मंदिर, दर्गाह परिसरात उपस्थित राहणार असल्याचे समितीने कळविले आहे़नांदेड जिल्ह्यातील हा पारंपरिक गोदावरी महामहोत्सव १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे़ पहाटेपासून शहराच्या विविध भागातून मानकरी दिंड्याचे आगमन होईल़ मानकरी दिंड्यासह जथ्थे, मानकरी सुकळीकर, येळेगावकर, नंदिमहाराज, वारकवाडी, नामदेव महाराज यांच्या दिंड्याचे विविध ठिकाणी स्वागत होते़ सदर दिंड्या १७ जानेवारी रोजी सकाळी रामघाट येथून निघून किल्ला गोदावरी मंदिर-कल्याणराव समाधी नावघाट पूजा आटोपून दर्गा सराय संत दासगणू घाट येथे गळाभेट कार्यक्रम होईल़ या एकात्मता कार्यक्रमानंतर मौलाली दर्गाह करबला येथील सत्कार घेवून गौतमेश्वर तारातीर्थ मंदिर धनेगाव येथील संत समागम यात्रेत सहभागी होतील़ महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विकासविषयक चर्चा, नांदेड अपीरल क्लस्टर-तयार कपडे होजीअरी प्रोजेक्ट चर्चा-युनिट नोंदणी कार्यक्रम होणार आहेत़ १८ जानेवारी रोजी काला कार्यक्रमानंतर महोत्सवाची समाप्ती होईल, अशी माहिती महामहोत्सव समितीचे प्रा़डॉ़एऩई़ अंभोरे, रावसाहेब महाराज, ग्रिष्मसिंह देशमुख, प्रा़डॉ़ पुष्पा कोकीळ, प्रा़डॉ़जयश्री देशमुख, अ‍ॅड़सावित्री जोशी आदींनी कळविली आहे़जिल्हा प्रशासनास समितीचे निवेदनगोदावरी महामहोत्सवानिमित्त येणाºया दिंंड्या आणि भाविकांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना व सुविधा पुरविण्यासंदर्भात समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे़ यामध्ये स्नानासाठी गोदावरीच्या दोन्ही काठावरील काळेश्वर विष्णूपुरी, कोटतीर्थ, असर्जन, उर्वसीडंकीन, भीमघाट, गोवर्धनघाट, रामघाट, बाळगीर महाराजघाट, साईमंदिर, सेना न्हावी मंदिर, कौठा, नगीनाघाट, श्रीचंद्रघाट, नामदेवघाट, कल्याणराव समाधीस्थळ आदी ठिकाणी कुंड तयार करून ते पाण्याने भरून घेणे, रस्त्याची सुविधा, खड्डे बुजविणे, पथदिवे लावणे, आरोग्य सुविधा, जीवरक्षक तैनात करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़निवेदनावर संयोजक प्रा़ डॉ़ एऩ ई़ अंभोरे, हरेशभाई ठक्कर, रावसाहेब ऊर्फ बाळगीर महाराज, गिष्मसिंह देशमुख, देवराव काळे, प्रा़डॉ़पुष्पाताई कोकीळ, अ‍ॅड़सावित्री जोशी, एऩ के़ क्षीरसागर, प्रा़ डॉ़ मेहमुदा बेगम, अशोकराव पवळे, प्रा़ डॉ़ जयश्री देशमुख, नामदेराव कदम, आनंद वाघमारे, बी़ आऱ माने, मुतवली अंगारे शाह, पी़ डी़ भोसले, सुचिता उखळकर, लक्ष्मीकांत माळवतकर, केशव मालेवार, सतू महाराज आदींच्या स्वाक्षºया आहेत़१६ ते १८ जानेवारीदरम्यान गोदावरी महामहोत्सव४हिंदू-मुस्लिम एकात्मतेची महोत्सवाला परंपरा४प्रशासनाकडून तयारी सुरु