शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी बदली प्रक्रिया १३ मे पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:08 IST

जिल्हा परिषदेतील तृतीय व चतूर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रियेला आता १३ मे पासून सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबतच्या फाईलवर जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांची मंगळवारी स्वाक्षरी झाली असून १३ ते १५ मे या कालावधीत काऊंसिलिंगद्वारे बदली प्रक्रिया पार पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेतील तृतीय व चतूर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रियेला आता १३ मे पासून सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबतच्या फाईलवर जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांची मंगळवारी स्वाक्षरी झाली असून १३ ते १५ मे या कालावधीत काऊंसिलिंगद्वारे बदली प्रक्रिया पार पडणार आहे.शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बदली प्रक्रियेसाठी ५ ते ९ मेपर्यंत जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची काऊसिंलीगद्वारे बदली प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही कारणास्तव ही प्रक्रिया ९ मेपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली ४ मे रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थाई समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया ९ ते १५ मे या कालावधीत काऊसिंलींगच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पुन्हा एकदा बदली प्रक्रियेच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यापूर्वी जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांची एक बैठक घेण्यात आली. यामध्ये पदाधिकाºयांनी बदली प्रक्रिया १३ ते १५ मे या कालावधीत घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.त्या अनुषंगाने मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बदली प्रक्रिये संदर्भात एक फाईल तयार केली. त्यावर जि.प. अध्यक्षा शांताबाई पवार व जि.प. चे सीईओ अशोक शिनगारे यांची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची बदली प्रक्रियेला आता १३ मे पासून सुरूवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.६१७ कर्मचारी बदलीसाठी पात्रबदलीसाठी जिल्हा परिषदेच्या अकरा विभागातील ६१७ कर्मचारी पात्र ठरले आहेत़ यात बांधकाम विभाग-१३, लघूसिंचन विभाग-१, ग्रामीण पाणीपुरवठा-४, कृषी-६, पशूसंवर्धन-१४, महिला व बालकल्याण-१०, सामान्य प्रशासन-५८, आरोग्य-६६, वित्त-१२, शिक्षण-३४ तर ग्रामपंचायत-५५ कर्मचाºयांचा समावेश आहे़बदली प्रक्रियेसाठीची आवश्यक तयारी जिल्हा परिषदेकडून सुरु आहे़ समुपदेशनाच्या वेळी बदली पात्र कर्मचाºयांची वास्तव ज्येष्ठता यादी आणि विनंती अर्जाची यादी तयार असणार आहे़ याबरोबरच रिक्त पदाचा आणि संभाव्य रिक्त पदाचा संवर्गनिहाय अहवाल अद्ययावत ठेवण्यात येणार असून रिक्त पदाचा अहवाल प्रोजेक्टवरील स्क्रिनवर दाखविण्यात येणार आहे़अशी पार पडणार प्रक्रिया१३ ते १५ मे या कालावधीत पार पडणाºया या बदली प्रक्रियेचा प्रारंभ १३ मे रोजी अर्थ विभागातील कर्मचाºयांच्या बदल्याने सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होणार आहे़ ११ ते २ या वेळेत शिक्षण विभाग तर दुपारी २ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत ग्रामपंचायत विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या होतील़१४ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत बांधकाम विभाग (दक्षिण-उत्तर), ११ ते १२ या वेळेत लघूपाटबंधारे विभाग, दुपारी १२ ते १ या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा, दुपारी १ ते २ कृषी विभाग, दुपारी २ ते ३ पशूसंवर्धन, ३ ते ४ महिला व बालकल्याण तर ४ वाजेनंतर सामान्य प्रशासन विभागातील बदल्या होतील़ १५ मे रोजी सकाळी ९ पासून आरोग्य विभागाच्या बदल्या होतील़

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र