शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नांदेड- वाघाळा महापालिकेत मोठ्या आघाडीसह कॉंग्रेस सुसाट, सर्व विरोधक पिछाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:26 PM

संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या निकालानुसार २२ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाले आहे तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवत आला आहे.

ठळक मुद्देमोठ्या आघाडीसह कॉंग्रेसची बहुमताकडे वाटचाल६० टक्के मतदान झाले होतेव्हीव्हीपीएटी मशीनवरील प्रिंटचीही होणार मोजणी

नांदेड, दि. १२  : संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या निकालानुसार २२ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाले आहे तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवत आला आहे. यामुळे मोठ्या आघाडीसह कॉंग्रेस सुसाट पुढे जात असून सर्व विरोधक पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.

देशाध्यक्ष अशोक चव्हाण विरुद्ध सारे अशी रंगरदार लढत झालेल्या या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. परंतु, निकालात सुरुवातीपासूनच कॉंग्रेसने मोठी आघाडी घेत मोठी मुसंडी मारत विजयाच्या दिशेने सुसाट वाटचाल सुरु केली आहे. याप्रमाणात भाजप, शिवसेना व एमआयएम यांचा कुठेच निभाव लागला नाही असेच चित्र दिसत आहे. सत्ता मिळवण्याचा दावा केलेल्या भाजपची पिछेहाट दिसत आहे. 

६० टक्के मतदान झाले होतेनांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. एकूण ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार होते, त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. 

व्हीव्हीपीएटी मशीनवरील प्रिंटचीही होणार मोजणी काल नांदेडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आल्या होत्या. एकूण ३७ मशीन होत्या. त्यातील ६ बंद झाल्याने नेहमीच्या इव्हीएमवरवर मतदान घेण्यात आले होते. आज केवळ ३१ व्हीव्हीपॅट मशीनवरील मोजणी होत आहे. व्हीव्हीपीएटी मशीन वर ज्या प्रिंट निघाल्या त्यांची मोजणी देखील होणार आहे. निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिली आहे. याचा अर्थ मशीनवर झालेले मतदान आणि ट्रे मध्ये असलेल्या प्रिंट तपासल्या जातील. हि मोजणी सर्वात शेवटी होईल.

ताजा निकाल : एकूण जागा 81पक्ष             विजय       आघाडी काँग्रेस          24           20भाजपा           1             01शिवसेना       00          01एमआयएम   00         00राकाँ              00         00इतर              00         00अपक्ष            00         00