शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: पुरातही कर्तव्य सोडले नाही; थर्माकोलचा आधार घेऊन शिक्षक पोहोचले ध्वजारोहणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:51 IST

'अहो, सुट्टी मारायला जमणार नाही आणि पोहताही येईना...'पुरामुळे मार्ग बंद, तरीही गावकऱ्यांनी शिक्षकांना झेंडावंदनासाठी सुखरूप पोहोचवले, हदगाव तालुक्यातील मनुला गावाची घटना

हदगाव: हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने दाखवलेल्या कर्तव्यानिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटलेला असतानाही, या शिक्षकाने स्थानिक मासेमारांच्या मदतीने थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार करून शाळा गाठली. 

हदगाव तालुक्यातील तळणी केंद्रातील मनुला खु. हे गाव पैनगंगा नदीच्या पुरामुळे पूर्णपणे वेढले गेले होते. गावाकडे जाण्याचा रस्ता पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला होता. अशा परिस्थितीत हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन करण्यासाठी शिक्षकांना पोहोचणे आवश्यक होते. मात्र, एका शिक्षकासमोर मोठी अडचण उभी राहिली.

या शिक्षकावर यापूर्वी दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि त्यांना अर्धांगवायुचा त्रास आहे. त्यामुळे, पुराच्या पाण्यातून जाणे त्यांच्यासाठी धोकादायक होते. सुट्टी मारणे त्यांना शक्य नव्हते आणि पोहताही येत नव्हते, त्यामुळे त्यांची मोठी तारांबळ उडाली. 'निवृत्त होण्यासाठी फक्त एक-दोन वर्षे शिल्लक असताना माझ्यावर ही जीवघेणी परिस्थिती का आली?' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गावकऱ्यांनी दिला मदतीचा हातशिक्षक अडचणीत असल्याचे लक्षात येताच स्थानिक प्रशासनाने आणि मासेमारी करणाऱ्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. मासेमार व्यावसायिक भोई यांनी शिक्षकांसाठी थर्माकोलचा एक तराफा उपलब्ध करून दिला. त्यांच्यासोबत मासेमारांचा एक सदस्यही देण्यात आला. या तराफ्याच्या मदतीने शिक्षकांनी पुराची नदी यशस्वीरित्या पार केली. अखेर, ते शाळेत सुखरूप पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण केला.

टॅग्स :floodपूरMarathwadaमराठवाडाNandedनांदेडTeacherशिक्षक