शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
8
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
9
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
15
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
18
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
19
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
20
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: 'मुलगी पाहायला' जाताना कुटुंबावर काळाचा घाला; भावी नवरदेव-बहीण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:29 IST

दोन तास जखमी विव्हळत होते! गोजेगाव येथील अपघाताने नांदेड-नागपूर महामार्ग हादरला

हदगाव (नांदेड):लातूर येथील एका कुटुंबावर नियतीने क्रूर खेळ केला आहे. आपल्या एकुलत्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर मुलासाठी 'जीवनसाथी' शोधण्याच्या आनंदाने चंद्रपूरला निघालेल्या या कुटुंबाला नांदेड-नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथे भीषण अपघाताचा सामना करावा लागला. या दुर्घटनेत मुलगी पाहायला निघालेला भावी नवरदेव मनोज दिघोरे (देवरे) आणि त्याची नातेवाईक मनीषा राचेवाड (रासेवाड) हे दोघे भाऊ-बहीण जागीच ठार झाले, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी आहेत.

मनोज दिघोरे याचे कुटुंब लातूर येथे राहते, तर त्याच्या दोन बहिणी पुण्याला. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याला मुलगी पाहण्यासाठी हे सर्व कुटुंब कारने (एमएच ०४ जीजे ७३०७) चंद्रपूरकडे जात होते. दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील पेट्रोल पंपासमोर तुळजापूर-नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा पर्यायी रस्ता दिलेला नव्हता. रस्त्यावर अचानक जेसीबी तोंड काढून उभी असताना, कारच्या पुढील आयशर गाडीने ब्रेक मारला, पण ती जेसीबीला धडकली. मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने आयशरला इतकी जोरदार धडक दिली की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

आनंदाच्या प्रवासाचा शोकांतिकाया भीषण धडकेत कार चालवत असलेला मुलगा मनोज दिघोरे (सॉफ्टवेअर इंजिनियर) आणि त्याची नातेवाईक महिला मनीषा राचेवाड यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते, तर गाडीतील तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह आयशरचा चालक शाहरुख खान सुभान खान (वय ३४) आणि इतर सात ते आठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे स्वरूप एवढे भयंकर होते की, पाहणाऱ्यांनाही चक्कर येत होती. जखमींना दोन तास उलटूनही शुद्ध नव्हती. या दुर्घटनेत एका लहान मुलीसह, आई-वडील आणि इतर दोन बहिणी गंभीर जखमी आहेत.

गावकऱ्यांनी धाव घेतली, उपचार सुरूअपघात होताच अंकुश बोधचे (बानेगाव सरपंच प्रतिनिधी), सुदर्शन आढाव, आशिष कल्याणकर यांच्यासह दत्ता पाटील, राजू तावडे, बालाजी ढोरे, गजानन देवसरकर, मिलिंद पाईकराव, गंगाधर काळे, शंकर जळके या तरुणांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात (हदगाव) दाखल केले, तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यानेच हा भीषण अपघात झाल्याची चर्चा परिसरात आहे. या घटनेमुळे लातूर आणि हदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes Family En Route to Marriage Proposal; Groom, Sister Killed

Web Summary : A family traveling to Chandrapur to find a bride for their son met with a fatal accident near Hadgaon. The groom and his sister died, while others sustained serious injuries due to ongoing road work lacking safety measures.
टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडlaturलातूर