शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'नांदेड ते ग्वाल्हेर व्हाया अमृतसर!' रेल्वेच्या पार्सल विभागाने दुचाकी १२ दिवस फिरवली; मालकाला मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:55 IST

नांदेडच्या दुचाकीची १२ दिवस फुकट 'भारत भ्रमंती'; रेल्वेच्या अजब कारभाराचा ग्राहकाला फटका

नांदेड : रेल्वेच्या पार्सल विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडहून ग्वालियरला पाठविण्यात आलेली एमएच २६ सीजे ९१६५ क्रमांकाची दुचाकी तब्बल १२ दिवस मालकाच्या ताब्यात पोहोचली नाही. सचखंड एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी रोजी दुचाकी रवाना केली, नियमानुसार ती ८ फेब्रुवारीला ग्वालियर येथे उतरविणे अपेक्षित होते. मात्र, तेथील पार्सल विभागाने दुचाकी उतरवून घेतली नाही.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, ९ फेब्रुवारीला परतीच्या प्रवासातही ती उतरवली गेली नाही आणि दुचाकी गेली तशी नांदेडला परत आली. १० फेब्रुवारीला पुन्हा ग्वालियरला पाठवली असता अमृतसरपर्यंत जाऊन परत पार्सल विभागाने तोच कित्ता पुन्हा गिरवला. अखेर १५ फेब्रुवारीला फिरोजपूर एक्स्प्रेसने पाठवल्यानंतरच दुचाकी अपेक्षित ठिकाणी पोहोचली. मात्र, यासाठी तब्बल १२ दिवस प्रतीक्षा संबंधित दुचाकी मालकाला करावी लागली. या काळात संबंधित मालकाला प्रचंड मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि वेळेची नाहक हानी सहन करावी लागली. या प्रकारामुळे रेल्वे पार्सल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

ना दाद ना फिर्यादरेल्वे हे प्रवासाचे सुलभ, सुरक्षित व गतिमान साधन असले तरी या विभागाची आर्थिक भरभराट प्रवाशांपेक्षा माल वाहतुकीतून आहे. अशावेळी माल वाहतूक सेवेत तत्परता असणे अपेक्षित आहे. एक दुचाकी रेल्वेने पाठवायची झाल्यास त्यासाठी वातानुकूलित प्रथम श्रेणीच्या प्रवासाइतके भाडे आकारले जाते. मात्र वाहन असो की पार्सल अतिशय निष्काळजीपणे हाताळले जाते. पार्सल पाठवले म्हणजे आमची जबाबदारी संपली, तुमचे वाहन पोहोचले की नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नसल्याचे सांगून या विभागातील अधिकारी नामानिराळे होतात. केवळ पार्सल विभागच नव्हे तर रेल्वेमंत्री, रेल्वे मंत्रालयसुद्धा प्रवाशांच्या तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Bike's Bizarre Rail Journey: Nanded to Gwalior via Amritsar!

Web Summary : A bike sent from Nanded to Gwalior by rail parcel took 12 days, bizarrely traveling to Amritsar and back due to departmental negligence. The owner faced distress and financial loss. The incident raises serious questions about railway efficiency and accountability.
टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वे