शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड हादरले! प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणींवर घराजवळ गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:11 IST

मागीलवर्षी जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांना सुरक्षारक्षक देण्यात आला होता, काही दिवसांपूर्वीचा सुरक्षारक्षक काढण्यात आला आणि आज ही घटना घडली

नांदेड: नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्याच घरासमोर स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शारदा नगर येथे घडली. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही जखमींवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलीस घटनास्थळी दाखल  झाले असून हा गोळीबार कुणी केला ? याचा शोध घेतायत. दरम्यान, गंभीर जखमी बियाणी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालीय का याचा शोध घेणे सुरू आहे. 

दरम्यान, मागील वर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला होता. त्यात आता ही घटना घडली. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस