शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:39 IST

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच रात्री संपूर्ण कुटुंब संपलं

मुदखेड (नांदेड): मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार (बारड सर्कल) येथे माणुसकीला चटका लावणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांसह दोन तरुण मुलांनी सामूहिक आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी (दि. २४) रात्री ही घटना घडली असून, या मृत्यूकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

घरात आई-बाप, रुळावर मुलं! मिळालेल्या माहितीनुसार, रमेश लखे आणि त्यांची पत्नी राधाबाई लखे हे दोघेही राहत्या घरात बाजेवर मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे, त्यांची दोन तरुण मुलं - उमेश आणि गोविंद यांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. एकाच वेळी कुटुंबातील चारही आधारस्तंभ कोसळल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृत्यूचे गूढ कायम; फॉरेन्सिक टीम पाचारण या सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरची परिस्थिती हलाखीची होती की आणखी काही कौटुंबिक कारण होते, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. "आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले असून मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनेचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून तपासानंतरच सत्य समोर येईल," असे मंठाळे यांनी सांगितले.

गावावर शोककळा अल्पभूधारक असूनही कष्टाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या लखे कुटुंबाचा असा शेवट होईल, अशी कल्पनाही ग्रामस्थांनी केली नव्हती. तरुण मुलांच्या जाण्याने आणि आई-वडिलांच्या संशयास्पद मृत्यूने जवळा मुरार परिसरात स्मशानशांतता पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Tragedy: Parents Found Dead, Sons End Lives by Train

Web Summary : A family in Nanded faced unimaginable tragedy as parents were found dead at home, and their two sons committed suicide by jumping in front of a train. The cause remains unclear; police are investigating the devastating incident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड