शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचे रेल्वे जाळे आता एकाच छताखाली; दक्षिण मध्य रेल्वेच्या रचनेत बदलाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:50 IST

परळी, उदगीर, धर्माबादचा नांदेड विभागात समावेश प्रस्तावित!

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रशासकीय रचनेत लवकरच बदल होण्याचे संकेत मिळत असून, नांदेडरेल्वे विभागाचा विस्तार परळी, उदगीर आणि धर्माबादपर्यंत करण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. सध्या सिकंदराबाद आणि हैदराबाद विभागांतर्गत येणारी ही मराठी भाषिक शहरे नांदेड विभागात समाविष्ट झाल्यामुळे संपूर्ण मराठवाडा रेल्वे प्रशासकीयदृष्ट्या एकाच छताखाली येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेमधील गुंतकल, गुंटूर आणि विजयवाडा हे तीन विभाग साऊथ कोस्टल रेल्वेमध्ये वर्ग झाल्यामुळे, उर्वरित विभागांच्या पुनर्गठनासाठी १ एप्रिल २०२६ पासून ही स्थानके हस्तांतरित करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.

या विस्तारामुळे केवळ भाषिक एकत्रीकरणच होणार नाही, तर विभागाच्या मालवाहतुकीत मोठी वाढ होऊन रेल्वेच्या उत्पन्नालाही गती मिळणार आहे. प्रवाशांना या बदलामुळे अधिक वेगवान गाड्या आणि सुधारित सुरक्षा यंत्रणेचा लाभ मिळणे सोपे होईल. सध्या नांदेड विभागाची मर्यादा केवळ मुदखेडजवळील शिवणगावपर्यंत मर्यादित आहे, ती आता धर्माबाद आणि परळी-विकाराबाद मार्गावर उदगीरपर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या बदलामुळे नांदेड विभागातील रेल्वे ट्रॅकच्या लांबीमध्ये तब्बल १०६ किलोमीटरची वाढ होणार असून, सध्या असलेले ९९१ किलोमीटरचे अंतर आता १ हजार ९७ किलोमीटरवर पोहोचणार असल्याचे मराठवाडा प्रवासी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.

या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून लवकरच ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता असून, तसे झाल्यास मराठवाड्यातील रेल्वे विकासाला नवी दिशा प्राप्त होईल. प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या या मागणीला प्रशासकीय मान्यता मिळाल्यास स्थानिक रेल्वे सुविधांमध्ये मोठी क्रांती घडून येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada's Railway Network Under One Roof: South Central Railway Restructuring Proposed

Web Summary : Nanded Railway Division expansion proposed, integrating Marathwada under one administrative unit. This includes Parli, Udgir, and Dharmabad. The move promises enhanced freight transport, revenue, faster trains, and improved safety. Awaited approval could revolutionize local railway facilities.
टॅग्स :railwayरेल्वेNandedनांदेड