शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

नांदेड पोलीस भरतीतील घोटाळा उघड; १२ जण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:09 IST

नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात ६९ पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च २०१८ ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत भरती प्रक्रिया राबवली या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी पेपर जाणीवपूर्वक कोरे सोडले.

नांदेड : नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याच पद्धतीने राज्यात चार ठिकाणी घोटाळा झाला असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

नांदेड जिल्ह्यात ६९ पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च २०१८ ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत पोलीस  मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी पेपर जाणीवपूर्वक कोरे सोडले. या पेपर तपासणीच्यावेळी ओएमआर पद्धतीच्या पत्रिका भरती प्रक्रियेत संगणकीय विभागात काम करणाऱ्या   आॅपरेटर्समार्फत उमेदवारांच्या रिकाम्या उत्तरपत्रिकेवर योग्य उत्तरे भरुन जवळपास ९० गुण प्राप्त केले. 

या भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासाठी औरंगाबादचे आयआरबी विभागाचे पोकॉ नामदेव ढाकणे, राज्य राखीव दलाच्या जालना येथील ग्रूप ३ चे पोकॉ शुक्राचार्य बबन टेकाळे, शेख आगा, सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल दिलीप साळुंके, ओएमआर आॅपरेटर प्रवीण भाटकर आणि दिनेश गजभारे यांनी सहकार्य केले तर भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या ओमकार संजय गुरव, कृष्ण काशिनाथ जाधव, शिवाजी श्रीकृष्ण चेके, कैलास काठोडे, आकाश दिलीप वाघमारे, सलीम मोहमद शेख, समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के, सुमित दिनकर शिंदे, मुकीद मकसुद अब्दुल, हनुमान मदन भिसाडे, रामदास माधवराव भालेराव आणि संतोष माधवराव तनपुरे यांनी भरती होण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये देण्याचे कबूल केले आणि खोटे दस्तावेज तयार करुन मूळ दस्तावेजाजागी ते खरे म्हणून वापरले. यात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी परीक्षा प्रक्रियेतील नऊ उमेदवार तसेच सॉफ्टवेअर कंपनीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा ओएमआर आॅपरेटर प्रवीण भाटकर तसेच अन्य एकजण असल्याचे पोलीस अधीक्षक मीना यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांचीही उपस्थिती होती.

असा झाला घोटाळा उघड  या परीक्षेत पोलीस भरतीसाठी परीक्षा दिलेल्या समाधान सुखदेव मस्के आणि किरणअप्पा मस्के  या दोघांना समान गुण मिळाले. हे दोघेही राहणार देऊळगाव राजा तालुक्यातील होते. या दोघांसह देऊळगाव राजा येथील अन्य पाच जणही लेखी परीक्षेत ९० गुणांपर्यंत पोहोचले होते. एकाच गावातील सर्वांना जवळपास सारखे गुण मिळणे ही बाब पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी लेखी परीक्षेदरम्यान छायाचित्रण तपासले. या छायाचित्रणात सदर परीक्षार्थी उत्तरे सोडविण्याऐवजी इतरत्र पाहत निवांत होते. परीक्षेचा कोणताही ताण त्यांच्यावर नव्हता. हे छायाचित्रण तपासल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या. त्यात उत्तरे लिहिल्याचे आढळले होते. त्यामुळे एकूणच हा प्रकार संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका पोलिसांनी परत घेतल्या होत्या. त्या प्रश्नपत्रिकेवर आकडेमोड करण्यासाठी काही जागा सोडली होती. त्या जागेवर या उमेदवारांनी कोणतीही आकडेमोड केली नसल्याचेही तपासात पुढे आले. अधिक चौकशीत या भरती प्रक्रियेत संगणकीय विभाग सांभाळणाऱ्या एसएसडी सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह ओएमआर आॅपरेटर आणि पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे उघड झाले.

पाच वर्षांपासून ‘एसएसजी’ नांदेडातनांदेड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी मागील पाच वर्षांपासून सांगलीची एसएसजी सॉफ्टवेअर्स कंपनी लेखी परीक्षा घेत आहे. त्यामुळे मागील चार वर्षांतील भरती प्रक्रियाही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मीना यांनी सांगितले.  

टॅग्स :Nanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेडexamपरीक्षाfraudधोकेबाजी