शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

नांदेड मनपाची घंटागाडी आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:58 AM

महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीपीएस सिस्टीमद्वारे मिळणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे.शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत ११९ वाहनांद्वारे कचरा उचलला जाणार आहे. कचरा उचलणारी ही वाहने नेमकी कुठे आहेत याचा शोध शहरातील नागरिकांना आॅनलाईन घेता येणार आहे. सदरील घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. घंटागाड्यांचा शोध घेण्यासाठी अ‍ॅनराईड मोबाईलवर गुगल प्लेस्टोअरमधून ऋछकळफअउङ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर पुढच्या पेजवर सर्व्हरनेम विचारणा करते. तेथे श्ळर हे सर्व्हरनेम टाकून कनेक्ट करावे. त्यानंतर अ‍ॅपवर युजरनेम या ठिकाणी ठअठऊएऊटउ असे व पासवर्डच्या ठिकाणी 123456 असे टाकून लॉगीन दाबा. या पेजवर चालू असलेल्या किंवा थांबलेल्या, बंद व इतर प्रकारे घंटागाडीची थेट माहिती मिळेल. तसेच डाव्या हाताच्या वरच्या बाजूस असलेल्या तीन आडव्या रेषा दाबल्यास आपणास घंटागाडीप्रमाणे ठिकाण तसेच घंटागाडीची इतर माहिती थेट मिळणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. शहरात व आपल्या घराजवळ असलेल्या कचºयाबाबतची माहिती घंटागाडीला दिल्यास शहर कचरामुक्त होईल तसेच परिसर स्वच्छ व निरोगी राहण्यास मदत होणार आहे. यातूनच नांदेड शहर हे स्वच्छ व सुंदर होईल, अशी अपेक्षाही महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.---शहरातील सहा झोनमध्ये कचरा संकलनाचा रूटमॅपही निश्चितघनकचरा व्यवस्थापनअंतर्गत महापालिका हद्दीतील क्षेत्रीय कार्यालय १ ते ६ मध्ये घरोघरी घनकचरा संकलन करणे, वाहतूक करणे, रस्ते झाडणे, नाली काढणे, नाल्यातील कचरा उचलणे आणि वाहतूकदारही डंपिंग ग्राऊंड येथे कचरा टाकण्याचे कामही ठेकेदारास देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, रस्ते सफाई करणे, नाल्या सफाई करणे आदी आदेशानुसार यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यानुसार ठेकेदाराने यंत्रसामग्री उपलब्ध करुन दिल्यानुसार प्रभागातील स्वच्छता निरीक्षकामार्फत रुटमॅपही निश्चित करण्यात आला आहे. या रुटमॅपनुसारच यापुढे कचरा उचलण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी चार घंटागाडी आणि एक टेम्पो तसेच मागणीनुसार सायकल रिक्षा देण्यात आले आहे. त्याचवेळी प्रभागनिहाय स्वच्छता निरीक्षक व सुपरवायझरची जबाबदारी निश्चित करुन देण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षकांनी प्रभागात घरोघरी कचरा संकलन करताना सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा संकलित करावा आणि नियोजित वेळापत्रकानुसारच कचरा उचलावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.---वाहन तपासणीचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या वतीने शहरात कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणाºया वाहनांची तपासणी करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिले आहेत.महापालिकेच्या कचरा उचलणाºया वाहनांची नोंदणी झाली नसून अनेक अनधिकृत वाहने कचरा उचलत असल्याची तक्रार महापालिकेच्या स्थायी समिती सदस्या ज्योत्स्ना गोडबोले यांनी १७ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती.ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथक क्र. १ आणि २ मध्ये कार्यरत सर्व मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना वाहन तपासणीचे आदेश दिले आहेत. दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.कचरा संकलनाबाबत मागील काही दिवसांपासून तक्रारीत वाढ झाली आहे. या तक्रारीचे निरसन मनपाला करावे लागणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका