शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

नांदेड महापालिकेची पुरवठा विभागाची ठेकेदारास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:58 IST

शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

ठळक मुद्देगव्हाचा काळा बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.नांदेड येथील जवाहरनगर भागात असलेल्या केंद्रीय खाद्य निगमच्या गोदामातून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी अन्न-धान्य पुरवठा केला जातो. बुधवारी रात्री पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील ७ आणि नांदेड जिल्ह्यातील ३ असे १० ट्रक नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनी लि. येथे जात असताना पकडले. येथील तीन ट्रक नांदेड जिल्ह्यातील असल्याने पुरवठा विभागाने या प्रकरणात वाहतूकदार पारसेवार अ‍ॅन्ड कंपनीला नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. १९ जुलै रोजी हा खुलासा मागवण्यात आला होता. या प्रकरणात दोषी आढळल्यास वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. २० जुलै रोजी वाहतूक कंत्राटदार पारसेवार अ‍ॅन्ड कंपनीने खुलासा देत पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील तीन ट्रक हे नांदेड-नायगाव महामार्गावरील कृष्णूरनजीक असलेल्या रामदेव ढाबा येथूनच ताब्यात घेतल्याचे खुलाशात म्हटले आहे. पुरवठा विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक ठेकेदाराने दिलेला खुलासा ग्राह्य धरल्यास पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पुरवठा संतोष वेणीकर यांनी आताच अधिक काही सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणात कागदपत्र प्राप्त होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील तीन ट्रक हे कुंडलवाडी, मुक्रमाबाद आणि अन्य एका ठिकाणी जात होते. हे तिन्ही ट्रक सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाले असल्याचीही माहिती मिळाली.दरम्यान, पोलीस विभागाने या प्रकरणात पुरवठा विभागाकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतले आहेत़---एफसीआयच्या गोदामावर नियंत्रण नाहीफूड कॉर्पोेरेशन आॅफ इंडिया अर्थात केंद्रीय खाद्य निगम गोदामातून पुरवठा विभागासह जिल्हा परिषद, बालविकास विभाग तसेच व्यापाऱ्यांनाही धान्य पुरवठा केला जातो.या गोदामातून शासकीय गोदामात धान्य पोहोचवले जाते. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानावर माल वाटप केला जातो.या सर्व प्रक्रियेत त्या- त्या तहसीलदारांकडून आवश्यक ते धान्य निश्चित केले जाते. धान्य निश्चित केल्यानंतर एफसीआयच्या मनमाड येथील कार्यालयात धनादेश देवून चालान घेतले जाते. या चालानद्वारे धान्याची उचल केली जाते. हिंगोली जिल्ह्यात एफसीआयचा बेस डेपो नसल्याने नांदेड येथूनच धान्य उचलले जाते.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका