शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:30 AM

शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देमहापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव विष्णूपुरीत मार्चपर्यंतचेच पाणी उपलब्ध

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ ३९.४९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा मार्च अखेरपर्यंत पुरणार आहे. त्याचवेळी प्रकल्पाच्या उपरोक्त भागातील धरणेही कोरडी पडल्याने पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे आहे त्याच पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पाणीप्रश्नाचे हे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेतली. प्रकल्प क्षेत्रातील डीपींचा विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला आदेशित करावे. त्याचवेळी प्रशासनाने स्थापन केलेल्या दक्षता पथकाला आदेश देवून पाणी उपसा करणारे विद्युतपंप जप्त करावे. प्रकल्पातून आजघडीला जवळपास ०.५७ दलघमी पाणी उपसले जात आहे.राज्य वितरण कंपनीला आदेश देवून एक्स्प्रेस फीडर बंद करावे, तसेच अवैध पाणीउपसा रोखावा, अशी मागणीही जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. त्याचवेळी शहरात पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे आदेशही महापौरांनी दिले आहेत. शहरात असलेल्या विंधन विहिरी, हातपंप दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचवेळी शहराची मदार आता पैनगंगेच्या पाण्यावर काही प्रमाणात राहणार आहे. मात्र, हे पाणी सिंचन पाळ्यासाठी पाणी सोडल्यानंतरच महापालिकेला मिळणार आहे. पैनगंगेत १५ दलघमी पाणी महापालिकेने आरक्षित केले आहे. यातील दोन दलघमी पाणी पहिल्या टप्प्यात उचलण्यात आले आहे.

  • विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात पथकांची निर्मिती केली आहे. मात्र ही सात पथके अद्यापही पूर्ण क्षमतेने कार्यरत न झाल्याने विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा सुरुच आहे.पथक क्र.२ मध्ये समाविष्ट असलेल्या नांदेड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही.आर. ऐटवार, नांदेड ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कदम, महावितरणचे लाईनमन शिंदे आणि वसरणीचे मंडळ अधिकारी बी.एस. देशमुख हे पथकाच्या कामावर सातत्याने गैरहजर असल्याचे पथकप्रमुख एस.एस. कोडगिरे यांनी कळविले आहे.
  • विष्णूपुरी क्षेत्रातील पथकाचीच ही अवस्था आहे.तर अन्य पथकांबाबत न बोललेलेच बरे !अशीच परिस्थिती आहे. प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत असताना पथकातील अधिकारी-कर्मचारी नियमितपणे अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कार्यरत राहणे आवश्यक असताना ते गैरहजर आहेत. या गैरहजर अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करावी, असे पत्र विष्णूपुरी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिका-यांनी नांदेड उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे आता गैरहजर राहणा-या कर्मचा-यावर कारवाई होते की ‘जैसे थे’ च परिस्थिती राहील, हे पहावे लागणार आहे.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका