नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 13:41 IST2020-09-15T13:39:42+5:302020-09-15T13:41:23+5:30
एक महिन्यापूर्वी खा.़ चिखलीकर आणि त्यांचा मुलगा पॉझिटिव्ह आले होते़

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटिव्ह
नांदेड : खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे़
एक महिन्यापूर्वी खा.़ चिखलीकर आणि त्यांचा मुलगा जि़प़सदस्य प्रवीण चिखलीकर हे पॉझिटिव्ह आले होते़ औरंगाबादहून उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त होऊन ते नांदेडला परतले होते.
दोन दिवसापूर्वीच नांदेड शहरातील विष्णूपुरी येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची त्यांनी पाहणी केली होती़ सोमवारी त्यांना पुन्हा सर्दीसह कोरोनाची इतर लक्षणे जाणवू लागल्यानंतर तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला़
बारा तास, बारा रुग्णालये फिरले https://t.co/xDfnmxftYS
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020