शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:37 IST

आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुंबळ हाणामारीनंतर रिसनगावात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

- गोविंद कदमलोहा ( नांदेड) : तालुक्यातील रिसनगाव येथे मराठा समाज व शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हाणामारी झाली. या घटनेत मराठा समाजातील विकास पवार व सुनील पवार हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून शिवा संघटनेचे कार्यकर्ते बालाजी एकलारे व दत्ता एकलारे यांनाही दुखापत झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी शासनाने लागू केलेला हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी करत शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच पार्श्वभूमीवर धोंडे यांच्या संस्थेतून २१ पालकांनी आपल्या मुलांचे टीसी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. प्रत्युत्तरादाखल ओबीसी समाजाकडूनही मराठा संस्थेतील २३ पालकांनी सामूहिकरीत्या टीसीसाठी अर्ज केला. या घटनांमुळे गावातील तणाव चिघळून शेवटी वाद हाणामारीत परिवर्तित झाला.जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विकास पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेनंतर नांदेड येथील सकल मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच रिसनगाव येथे तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही औपचारिक नोंद माळाकोळी पोलीस ठाण्यात झालेली नसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांनी लोकमतशी बोलताना दिली. मराठा–ओबीसी आरक्षणाच्या वादाला आता धोकादायक वळण लागले असून दोन्ही समाजातील तणावामुळे पुढील काळात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शांतता बैठकीतन वाद, हाणामारीत रूपांतरलोहा तालुक्यातील रिसनगाव येथील विठ्ठल-रुक्माई मंदिरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार भीमाशंकर कापसे यांनी सर्व समाजातील नागरिकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत मराठा-ओबीसी वाद थांबवावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. मात्र, चर्चा मार्गी न लागता वाद चिघळला व शेवटी तो हाणामारीत परिवर्तित झाला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड