शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! हदगाव तालुक्यात २ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:19 IST

दोन घरे उद्ध्वस्त, दोन चिमुरड्यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं!

हदगाव (नांदेड): नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हदगाव तालुक्यात अपघातांचे सत्र सुरू झाले असून, रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दगडवाडी येथील अनंत वानखेडे आणि हदगाव येथील सुवर्णकार गोविंद रत्नपारखी यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहिला अपघात: दगडवाडीचा तरुण जागीच ठार दगडवाडी येथील २२ वर्षीय अनंत सूर्यकांत वानखेडे हे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून वाळकीहून आपल्या गावाकडे परतत होते. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरशी त्यांची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, अनंत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.

दुसरा अपघात: युवा उद्योजकाची प्राणज्योत मालवली दुसरी घटना हदगाव शहरात रात्री ८ च्या सुमारास घडली. शहरातील सुवर्णकार ज्वेलर्सचे मालक गोविंद रत्नपारखी (३५) हे आपल्या मित्राच्या बुलेटवरून हदगावकडे परतत असताना पंचशील शाळेसमोर त्यांच्या बुलेटला ऑटोने धडक दिली. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नांदेडला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत शांत आणि संयमी स्वभाव असलेल्या गोविंद यांच्या जाण्याने रत्नपारखी कुटुंबाचा आधार हरपला आहे.

दोघे गंभीर जखमी या अपघातांमध्ये ऑटो चालक रवी बाबाराव दवणे (रा. हदगाव) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. तसेच ऑटोमधील प्रवासी सुधाकर रामराव वाघमारे (रा. गोजेगाव) यांना उपचारासाठी उमरखेड येथे दाखल करण्यात आले आहे. सोमवार, ५ जानेवारी रोजी दोन्ही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Fatal Accidents in Hadgaon Claim Two Young Lives

Web Summary : Two separate accidents in Hadgaon, Nanded district, claimed the lives of two young men. Anant Wankhede died in a collision with a tractor, while Govind Ratnaparkhi succumbed to injuries after a motorcycle accident. The incidents have cast a pall of gloom over the region.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात