शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये लग्न पत्रिकेतील नावासाठी फोडले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:18 IST

भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ही घटना नायगाव तालुक्यातील बरबडा येथे घडली़१२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संतोष रामदास आलमवाड हे घरासमोर उभे असताना बालाजी किशन आलमवाड हे त्या ठिकाणी आले़ यावेळी बालाजी आलमवाड याने भावाच्या लग्नाच्या वेळी लग्नपत्रिकेत नाव का टाकले नाही़ त्याचबरोबर सामाईक धुरा का फोडला म्हणून संतोष आलमवाड यांच्यासोबत वाद घातला़ त्यानंतर दगडाने संतोष आलमवाड यांचे डोके फोडले़ याप्रकरणी बालाजी आलमवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला़तर बालाजी आलमवाड यांच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला़ त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरी असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरात प्रवेश केला़यावेळी संतोष आलमवाड याने शेतीच्या धुऱ्याचा वाद काढून बालाजी आलमवाड यांना मारहाण केली़ यावेळी माधव आलमवाड याने केलेला कुºहाडीचा वार बालाजी आलमवाड यांनी चुकविला़ मध्यस्थी करणाºया बालाजी आलमवाड यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली़याप्रकरणी माधव गणपती आलमवाड, संतोष रामदास आलमवाड, गणेश माधव आलमवाड, योगेश माधव आलमवाड व शुभम बळीराम आलमवाड या पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

टॅग्स :NandedनांदेडCrimeगुन्हाmarriageलग्नPoliceपोलिस