शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

नांदेडवर पाणीबाणीचे संकट; विष्णूपुरीत केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 18:09 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ५.२० दलघमी पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ मेपर्यंत पुरेल इतका आहे

नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ५.२० दलघमी पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ मेपर्यंत पुरेल इतका आहे. त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून १० ते १५ मे या कालावधीत २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरापुढे पाणी संकट दिसत असले तरी त्यावरील तोडगाही उपलब्ध आहे. मात्र या सर्व बाबी नियोजनाप्रमाणे पूर्ण झाल्या तर नांदेडकरांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी विष्णूपुरी प्रकल्पात  ३ दलघमी मृतसाठा उपलब्ध असतो. या पाण्यावरही शहराची तहान भागू शकते. मात्र मृतसाठा उचलण्यापर्यंतची वेळ येणार नाही असे महापौर शीलाताई भवरे यांनी सांगितले.

 गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत पाणी उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले की, शहरासाठी डिग्रस बंधाऱ्यातून २० दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यातील १० दलघमी पाणी  सिंचन पाळ्यासाठी सोडण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर मधूनही १० दलघमी पाणी घेतले. त्यापैकी ३ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले. आता  २० दलघमी पाणी १५ मेपर्यंत उपलब्ध होईल. पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी इसापूर धरणातील १० दलघमी पाणी राखीव आहे. त्यापैकी अडीच दलघमी पाणी आसनात घेतले आहे. अडीच दलघमी पाणी घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. 

महापौर शीलाताई भवरे यांनी घेतलेल्या बैठकीत अमृत योजनेचा आढावा घेण्यात आला. शहरात अमृत योजनेतून १३२ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकली जाणार आहे. आतापर्यंत ६८.५१ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.  अमृत योजनेअंतर्गत शहरवासियांना पाणी लवकर देण्याचे निर्देशही यावेळी महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर विनय गिरडे,  नगरसेवक दुष्यंत सोनाळे, किशोर भवरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यास विरोधशहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र त्याला महापौर शीलाताई भवरे यांनी विरोध करत १७ मेपासून  सुरु होणाऱ्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमिवर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे उचित ठरणार नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडावे, असे निर्देशही महापौरांनी दिले. शहरात नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  शहरात ७५४ हातपंप आहेत. तर १९३ पावरपंप आहेत. या पंपांचे  सर्वेक्षण करुन  ते दुरुस्त केले जाणार आहेत.  

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणNandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिकाwater shortageपाणीटंचाई